गडचिरोली - किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाच्या वादातून पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना घडली. ही घटना चामोर्शी तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर असलेल्या आमगाव परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. प्रेमिला संदिप गावडे, असे मृत महिलेचे नाव आहे.
सुत्राच्या माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील आमगाव परिसरात संदिप गावडे (वय ३८) पत्नी प्रेमिला गावडे व आपल्या २ मुलांसह राहत होता. संदिप व प्रेमिला यांच्यात शुल्लक कारणावरून व संशयावरून भांडण व्हायचे. सोमवारी रात्रीच्या सुमारास संदिपव प्रेमिला यांच्यात भांडण झाले. यावेळी पती संदिप गावडे याचा राग अनावर झाला. तेव्हा त्याने घरात असलेल्या कुऱ्हाडीने प्रेमिला हिच्या गळ्यावर वार केला. यात प्रेमिला हिचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर संदिपहा घरातून पसार झाला.
घटनेची माहिती चामोर्शी पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार करत आहेत.मृतक प्रेमिला गावडे हिला ८ वर्षाची मुलगी व ६ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेमुळे आमगाव परिसरात शोककळा पसरली आहे.