ETV Bharat / state

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेतून 3 लाख 84 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी

author img

By

Published : Sep 30, 2020, 7:02 PM IST

गडचिरोली जिल्हा प्रशासनद्वारे नाविन्यपूर्ण थँक यू “आशाताई” ही मोहीम राबविली जात आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेबद्दल ऑनलाईन बैठकीत प्रशांसा केली होती. थॅन्क यू “आशाताई” यामध्ये आशा व इतर गावस्तरावरील कोरोना दूतांचे व्हिडीओ तयार करून प्रसिद्ध केले जाणार आहेत.

कोरोनाची जनजागृती
कोरोनाची जनजागृती

गडचिरोली - जिल्ह्यातील 3 लाख 84 हजार 977 नागरिकांची तपासणी गावस्तरावरील कोरोनादूतांनी केली आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक तसेच स्थानिक स्वयंसेवक 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत गावोगावी, घरोघरी नागरिकांची तपासणी करत आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम एक चळवळ म्हणून पुढे येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.

मोहिमेत प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होत आहेत. नागरिकांनी या मोहिमेबाबत गैरसमज करून घेऊ नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे नाविन्यपूर्ण थँक यू “आशाताई” ही मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यातील आशा वर्कर्स तसेच अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन आरोग्य शिक्षण देत आहेत. याकरिता त्यांचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या कामाचे महत्व लोकांना पटावे, यासाठी जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी थॅन्क यू “आशाताई” मोहीम जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यांचे काम सर्व स्तरात पोहचविणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेबद्दल ऑनलाईन बैठकीत प्रशंसा केली होती. थॅन्क यू “आशाताई” यामध्ये आशा व इतर गावस्तरावरील कोरोना दूतांचे व्हिडीओ तयार करून प्रसिद्ध केले जाणार आहेत.

सर्वेक्षणातून या बाबी आल्यासमोर -
जिल्ह्यातील 69 हजार 880 घरांमध्ये 3 लाख 84 हजार 977 नागरिकांची तपासणी पूर्ण केल्यानंतर 621 सारी व आयएलआयचे रूग्ण मिळाले. ऑक्सिजनचे प्रमाण 95पेक्षा कमी असणारे 1272 जण आढळून आले आहेत. संदर्भित केलेल्यांपैकी 40 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी 4 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. उर्वरित संदर्भित केलेल्या नागरिकांनाही घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.