ETV Bharat / state

आदिवासी विकास महामंडळाचा बेजबाबदारपणा.. गोदामांअभावी शेकडो क्विंटल धान्य पावसाने सडले

author img

By

Published : Jun 22, 2020, 5:27 PM IST

जिल्ह्यात दरवर्षी आदिवासी विकास महामंडळाकडून हजारो क्विंटल धान खरेदी केले जाते. मात्र खरेदी केलेले धान्य साठवणुकीसाठी जिल्ह्यात पुरेसे गोदाम नाहीत. परिणामी मान्सूनचे आगमन होताच जिल्ह्यातील अनेक धान खरेदी केंद्रावर शेकडो क्विंटल धान्य पावसाच्या पाण्यात भिजले.

gadchiroli
उघड्यावर असलेले धान

गडचिरोली - आदिवासी विकास महामंडळाकडून जिल्ह्यात दरवर्षी हजारो क्विंटल धान खरेदी केले जाते. मात्र खरेदी केलेले धान्य साठवणुकीसाठी जिल्ह्यात पुरेसे गोदामे नाहीत. परिणामी मान्सूनचे आगमन होताच जिल्ह्यातील अनेक धान खरेदी केंद्रावर शेकडो क्विंटल धान्य पावसाने भिजल्याने सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. यावर्षी आदिवासी विकास महामंडळाने जिल्ह्यात चार लाख क्विंटल पेक्षा जास्त धान्य खरेदी केले. मात्र धान्याची उचल न केल्याने धान्य केंद्रावरच पडून आहे. परिणामी गेल्या दोन दिवसात आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गोदाम नसलेल्या भागात उघड्यावर ठेवण्यात आलेले शेकडो क्विंटल धान पावसात भिजल्याने मातीमोल होण्याची शक्यता आहे.

गोदामांअभावी शेकडो क्विंटल धान्य पावसाने सडले

आदिवासी विकास महामंडळाने 30 एप्रिलपर्यंत खरीप हंगामाच्या धानाची खरेदी केली. या संपूर्ण काळात 4 लाख 72 हजार 10. 87 क्विंटल खरेदी धानाची झाली. मात्र ज्या खरेदी केंद्रावरून या धानाची खरेदी झाली होती, ती त्या भागातून केवळ 1 लाख 81 हजार 391.3 क्विंटल धानाची उचल आदिवासी विकास महामंडळाकडून करण्यात आली. हे संपूर्ण धान भरडाईसाठी काम घेतलेल्या राईस मिलकडे पाठविण्यात आले. तर 1 मेपासून रब्बी हंगामाच्या धानाची खरेदी सुरू झाली. मात्र ते धान्यही साठवणुकीसाठी गोदाम नाही.

gadchiroli
भिजलेले धान

37 केंद्रापैकी 25 ठिकाणच्या गोदामांची साठवण क्षमता कमी

धक्कादायक बाब म्हणजे, दक्षिण गडचिरोलीच्या 5 तालुक्यातील 37 केंद्रापैकी 25 ठिकाणी गोदाम आहे. मात्र जिथे गोदाम आहे, त्या गोदामांची साठवणीची क्षमता कमी आहे. क्षमता कमी असल्यामुळे याठिकाणी खरेदी झाली, तिथे उघड्यावरच हे धान पडून आहे. या खरेदी केंद्रावर उघड्यावर ठेवण्यात आलेल्या धानाच्या सुरक्षेसंदर्भात कुठलीही उपायोजना नसल्याने गेल्या तीन दिवसात आलेल्या पावसामुळे दुर्गम भागातील उघड्यावरील धान पावसाच्या पाण्यात भिजले आहे.

या भागातील धानाची पावसात भिजून झाली 'नासाडी'

सिरोंचा तालुक्यात अंकिसा, वडदम, बामणी तर भामरागड तालुक्यात मन्नेराजाराम, लाहेरी तसेच एटापल्ली तालुक्यात तोडसा, हालेवारा, घोटसुर, कोटमी तर अहेरी तालुक्यात पेरमिली आणि देचलीपेटा याठिकाणी गोदाम नसल्याने उघड्यावर ठेवण्यात आलेल्या धान्याची पावसात भिजून नासाडी झाली आहे. याठिकाणी अजूनही शेतकऱ्यांकडून रबी हंगामाच्या धान विक्रीसाठी खरेदी केंद्रावर नेले जात आहे. मात्र तिथे धान्य ठेवण्यासाठी जागा नसल्याने शेतकऱ्यांना चार ते पाच दिवस धान विक्रीसाठी वाट पाहत राहावे लागते. त्याकाळात या शेतकऱ्यांचे धान खरेदी झाले नाही आणि ते खरेदी केंद्रावर विक्रीची वाट पहात पाण्यात भिजून गेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे ते धान्य आदिवासी विकास महामंडळ खरेदी करणार का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

धान उघड्यावर राहणार पडून

आदिवासी विकास महामंडळांकडून धानाची भरडाई झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडून इतर जिल्ह्यात हे तांदुळ पाठवले जाते. यावर्षी जास्त उत्पादन होऊन खरेदीही जास्त झाली. त्यामुळे इतर जिल्ह्यात भरडाई पाठवलेले तांदुळ ज्या गतीने जायला पाहिजे ते गेलेले नाही. त्यामुळे सध्यातरी धान्याची उचल होण्याची शक्यता दिसत नाही. ज्या ठिकाणी उघड्यावर धान्य आहे, तिथे ताडपत्रीने हे धान झाकून ठेवणे हा एकमेव उपाय आदिवासी विकास महामंडळ राबवत आहे. अजूनही हे धान उचलून नेण्यासाठी पुरेशा गोदामांची व्यवस्था नसल्याने या पावसाळ्यात खरेदी करण्यात आलेले कोट्यावधी रुपयांचे धान असेच उघड्यावर पडून राहणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.