ETV Bharat / state

राज्यपालांची गडचिरोलीतील 'सर्च शोधग्राम'ला भेट; सर्च संस्थेच्या कार्याचे केल कौतुक

गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दांम्पत्याच्या नेतृत्वाखाली सर्च संस्थेतर्फे विविध माध्यमातून सुरू असलेले सेवाभावी कार्य प्रशासनासाठीही पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

author img

By

Published : Oct 11, 2021, 10:42 PM IST

Governor praised search organization
राज्यपाल कोश्यारी सर्च शोधग्राम भेट

गडचिरोली - गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दांम्पत्याच्या नेतृत्वाखाली सर्च संस्थेतर्फे विविध माध्यमातून सुरू असलेले सेवाभावी कार्य प्रशासनासाठीही पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

हेही वाचा - जहाल नक्षली अजय हिचामीला अटक; 2 लाखांचे होते बक्षीस

राज्यपाल कोश्यारी यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव येथे ‘सर्च’ संस्थेच्या शोधग्राम या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. सर्च संस्थेद्वारा विविध माध्यमातून सुरू असलेले काम त्यांनी जाणून घेतले. डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्याशी विविध उपक्रमांबाबत अनौपचारिक चर्चाही केली. तसेच, शस्त्रक्रिया होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांसोबतही राज्यपाल कोश्यारी यांनी संवाद साधला व उपचार सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.

उपदेश देणे सोपे आहे, पण प्रत्यक्ष कार्य करणे कठीण

शोधग्राम भेटीनिमित्त उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले की, डॉ. बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पातून विविध उपक्रमशील मनांना प्रेरणा मिळते. या स्थळी येऊन हे सारे उपक्रम स्वत: अनुभवण्याची माझी खूप दिवसांपासून इच्छा होती. दोन वर्षांपूर्वी मी गडचिरोलीत आलो होतो, परंतु वेळेअभावी येथे येऊ शकलो नाही. दारूबंदी व तंबाखूबंदीचे काम कठीण आहे, ते सातत्याने केले पहिजे. या पार्श्वभूमीवर सर्च संस्थेद्वारे गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखू बंदीचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, सिगारेट व बिडी पिण्याचे प्रमाण अनेक ठिकाणी कमी झाले आहे. उपदेश देणे सोपे आहे, पण प्रत्यक्ष कार्य करणे कठीण आहे, ही खरोखरच एक साधना आहे. ती तुम्ही निष्ठेने करत आहात, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

प्रतिबंधक लसीकरणाबाबत या भागात जागृती व्हावी

कोरोना साथीबाबत राज्यपाल म्हणाले की, कोरोना अजूनही संपलेला नाही, प्रधानमंत्र्यांनी आवाहन केल्याप्रमाणे कोरोना रोखण्यासाठी सुयोग्य काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रतिबंधक लसीकरणाबाबत या भागात जागृती व्हावी. निर्भय होतानाच जरूर काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मी नेहमी अशा सेवाभावी संस्था आणि उपक्रमांना जाणिवेने भेट देत असतो. प्रशासकीय अधिकारी वर्गाला पण अशा ठिकाणी नेत असतो. यातून मलाही खूप काही शिकायला मिळते, तसेच प्रशासनालाही काही चांगल्या बाबींची माहिती होते, असे त्यांनी राज्यपालांनी आवर्जून सांगितले.

या कार्यक्रमास राज्यपालांचे सचिव संतोष कुमार, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे गडचिरोली जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज सायंकाळी चार वाजता पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन झाले. राज्यपाल गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर, राजशिष्टाचार अधिकारी व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - नो इंजिनियर, नो इस्टिमेट : भन्नाट कल्पनेतून आदिवासींनी बांधला लाकडाचा पूल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.