ETV Bharat / state

गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांचे दोनदा ठरले वेळापत्रक.. तरीही पहिलाच पेपर रद्द करण्याची नामुष्की - gondwana university first paper exam

गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेची वेळ दोनदा ठरली. तरीही पहिलाच पेपर रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.

gondwana university
गोंडवाना विद्यापीठ
author img

By

Published : Oct 5, 2020, 10:41 PM IST

गडचिरोली - येथील गोंडवाना विद्यापीठाकडून ऑनलाईन परीक्षेला सोमवारी सुरुवात झाली. मात्र, परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचण उद्भवल्याने सकाळी 9 वाजताचा पेपर रद्द करत दुपारी 2 वाजता ठेवण्यात आला. मात्र, यावेळीही तांत्रिक अडचण दूर न झाल्याने पेपरच रद्द करावा लागला. त्यामुळे आता 5 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या सगळ्या ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षा आणि मुल्यमापन मंडळाने घेतला आहे.

राज्यात पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षेचा प्रयोग करण्यात येत आहे. अंतिम वर्षाच्या विविध 105 अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यातील 212 महाविद्यालयांचे 18 हजार 500 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना ग्रुप ऑनलाइन परीक्षा द्यायची होती. तर अकरा ठिकाणी ऑफलाइन सेंटर सुरू करण्यात आले होते. सकाळी नऊ ते सव्वा-दहाच्या दरम्यान पहिला पेपर होता. मात्र, पहिल्या ऑनलाइन पेपरला अनेक ठिकाणी इंटरनेटमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. अनेक विद्यार्थ्यांना लॉग-इन करता आले नाही. तर सर्व्हर सुरू न झाल्याने ही बाब अनेकांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला मोबाईलवर कॉल करुन कळवली.

सिरोंचा येथे तालुक्यात मोबाईल कनेक्टिव्हिटीची अडचण असल्याने ऑफलाइन सेंटरची मागणी करण्यात आली. मात्र, येथे ऑनलाइन परीक्षेलाच परवानगी असल्याने दुर्गम गावातल्या ज्या गावात नेटवर्क कनेक्टिव्हिटीची नाही, तेथील विद्यार्थ्यांसाठी सिरोंचा येथे वायफायची सुविधा देण्यात आली. काही विद्यार्थी तिथे सकाळपासुन येऊन बसले होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ऑनलाइन परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र, लॉगइन न झाल्याने परीक्षा देता आली नाही. अखेर सगळीकडुन आलेल्या अडचणी पाहुन सकाळच्या सत्रातील ही परीक्षा दुपारी दोन वाजता घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. मात्र, तेव्हाही अडचण दूर न झाल्याने अखेर पेपरच रद्द करावा लागला.

आता सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या 12 ऑक्टोबरपासून ठरवलेल्या पध्दतीने होतील. नवीन वेळापत्रक लवकरच कळवण्यात येईल, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. अनिल चिताडे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.