ETV Bharat / state

विद्यापीठ कर्मचारी कामबंद आंदोलन : गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे 5 ऑक्टोबरपासूनच - गोंडवाना विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा

गोंडवाना विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू केली असून तालुका आणि जिल्हा स्तरावर या परीक्षा ऑनलाईन 'एमसीक्यू' पद्धतीने 5 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहेत.

गडचिरोली
गडचिरोली
author img

By

Published : Oct 3, 2020, 8:12 PM IST

गडचिरोली - गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे येत्या 5 ऑक्टोबरपासून होणार आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सध्या झाला नसल्याचे गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

गोंडवाना विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू केली असून तालुका आणि जिल्हा स्तरावर या परीक्षा ऑनलाईन 'एमसीक्यू' पद्धतीने 5 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणी मोबाईल कनेक्टिव्हिटी नाही, त्या ठिकाणी कोविडच्या नियमांचे पालन करून ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत.

हेही वाचा - गडचिरोली जिल्हा परिषदेत २ कोटी ८६ लाखांचा अपहार; नागपुरातून 13व्या आरोपीला अटक

अंतिम वर्षाच्या या परीक्षेसाठी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या 210 महाविद्यालयांमधील 15 हजार नियमित विद्यार्थ्यांसह 'एटी-केटी'च्या माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह एकूण 24 हजार विद्यार्थी परीक्षा देण्याची शक्यता आहे. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातली 210 महाविद्यालय आहेत. त्यामध्ये एकूण 15 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर इतर अंतिम वर्षासह एटीकेटीच्या माध्यमांतूनही द्वितीय वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत. अशा संपूर्ण विद्यार्थ्यांची संख्या 24 हजारच्या जवळपास आहे.

हेही वाचा - गडचिरोलीतील पूरग्रस्तांसाठी २४ कोटींचा निधी मंजूर

कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे अमरावती विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्याने गोंडवाना विद्यापीठाच्या भुमिकेकडे सगळ्यांचे लक्ष होते. माञ येत्या पाच आक्टोबरपासुन गोंडवाना विद्यापीठाच्या नियोजीत परिक्षा होणार असुन सध्या तरी विद्यापीठ प्रशासन परिक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे कुलसचिव ईश्वर मोहुर्लै यांनी सांगितले. ज्या अडचणी येतील त्या दुर करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यानी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.