ETV Bharat / state

गडचिरोलीत सात वर्षीय मुलीचा गॅस्ट्रोने मृत्यू

author img

By

Published : Aug 29, 2019, 10:19 PM IST

कोरची येथून ५ किलोमीटर अंतरावरील बोळेना येथील दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या शिवाणी द्रुगसाय कोवाची या ७ वर्षीय मुलीचा गॅस्टोमुळे मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत शिवाणी

गडचिरोली - कोरची येथून ५ किलोमीटर अंतरावरील बोळेना येथील दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या शिवाणी द्रुगसाय कोवाची या ७ वर्षीय मुलीचा गॅस्टोमुळे मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोरची तालुक्यातील आरोग्य व्यवस्था तशी आधीच खिळखिळी झाली आहे. पावसाळा सुरू होताना तालुका आरोग्य अधिकारी आपल्या अधिनिस्थ कर्मचाऱ्यांना सूचना देऊन, प्रत्येक गावात उपाययोजना करतात. मात्र, प्रत्येक गावातील विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही तर दूषित पाण्यामुळे अतिसारासारखे साथीचे रोग पसरतात.

आस्वलहुडकी ग्रामपंचायती अंतर्गत बोळेना हे गाव ३ टोळ्यांनी मिळून बनले आहे. गावात ५ सरकारी विहिरी व ३ हातपंप आहेत. याच विहिरी व हातपंपाचे पाणी लोक पिण्यासाठी वापरतात. परंतु, यंदा विहिरी व हातपंपात ब्लिचिंग पावडर टाकण्यात आला नाही. त्यामुळे पाचही विहीरींचे पाणी दूषित झाले असून, हेच पाणी प्यायल्याने अतिसारासारखे आजार बळावत आहेत. गावातील ४-५ जणांना उलट्या व अतिसाराचा त्रास सुरू असून, त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. अशातच शिवाणी द्रुगसाय कोवाची या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला अतिसाराचा त्रास सुरु झाला. २७ ऑगस्टला ती दिवसभर शाळेत होती. दुसऱ्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास तिने प्राण सोडला.

Intro:गडचिरोलीत सात वर्षीय मुलीचा गॅस्ट्रोने मृत्यू

गडचिरोली : कोरची येथून ५ किलोमीटर अंतरावरील बोळेना येथील दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या शिवाणी द्रुगसाय कोवाची या ७ वर्षीय मुलीचा गॅस्टोमुळे म्रृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.Body:कोरची तालुक्यातील आरोग्य व्यवस्था तशी आधीच खिळखिळी झाली आहे. पावसाळा सुरू होताना तालुका आरोग्य अधिकारी आपल्या अधिनिस्थ कर्मचाऱ्यांना सूचना देऊन, प्रत्येक गावात  उपाययोजना करतात. मात्र प्रत्येक गावातील विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही तर दूषित पाण्यामुळे  हगवणीसारखे साथीचे रोग पसरतात.

आस्वलहुडकी ग्रामपंचायतींतर्गत बोळेना हे गाव ३ टोल्यांनी मिळून बनले आहे. गावात ५ सरकारी विहिरी  व ३ हातपंप आहेत. याच विहिरी व हातपंपाचे पाणी लोक पिण्यासाठी वापरतात. परंतु यंदा विहिरी व हातपंपात ब्लिचिंग पावडर टाकण्यात आला नाही. त्यामुळे  पाचही विहीरींचे पाणी दूषित झाले असून,  हेच पाणी प्यायल्याने हगवणीसारखे आजार बळावत आहेत. गावातील चार-पाच जणांना उलट्या व हगवणीचा त्रास सुरु असून, त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. अशातच शिवाणी द्रुगसाय कोवाची या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला हगवणीचा त्रास सुरु झाला. २७ ऑगस्टला ती दिवसभर शाळेत होती. दुसऱ्या दिवशी २८ ऑगष्टला सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास तिने प्राण सोडला.
Conclusion:सोबत फोटो आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.