ETV Bharat / state

गडचिरोलीच्या महिलांची दारूबंदीसोबत कोरोनाबाबत जनजागृती - गडचिरोली कोरोना अपडेट

दारूबंदीसाठी झटणार्‍या महिलांसाठी धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील महिलांनी परिश्रमाने दारूविक्री बंद केली आहे. ती कायमची बंद राहावी आणि गावात कुणीही लपून छपून विक्री करू नये यासाठी या महिला सकाळी आणि रात्री संपूर्ण गावात फिरून पाहणी करीत असतात. थोडाही संशय आल्यास त्या घराची झडती घेतात. परिणामी गावात दारूविक्री बंद आहे.

awareness about corona  gadchiroli corona update  गडचिरोली कोरोना अपडेट  गडचिरोली दारूबंदी
गडचिरोलीच्या महिलांची दारूबंदीसोबत कोरोनाबाबत जनजागृती
author img

By

Published : Apr 24, 2020, 8:03 PM IST

गडचिरोली - गावातील दारूबंदी कायम राहावी, यासाठी सकाळी व रात्री गावात फिरून तपासणी करतानाच मुरूमगावच्या महिला कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जनजागृती करीत आहेत. गावात दारू व खर्रा पूर्णपणे बंद व्हावा, यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.

awareness about corona  gadchiroli corona update  गडचिरोली कोरोना अपडेट  गडचिरोली दारूबंदी
गडचिरोलीच्या महिलांची दारूबंदीसोबत कोरोनाबाबत जनजागृती

दारूबंदीसाठी झटणार्‍या महिलांसाठी धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील महिलांनी परिश्रमाने दारूविक्री बंद केली आहे. ती कायमची बंद राहावी आणि गावात कुणीही लपून छपून विक्री करू नये, यासाठी या महिला सकाळी आणि रात्री संपूर्ण गावात फिरून पाहणी करीत असतात. थोडाही संशय आल्यास त्या घराची झडती घेतात. परिणामी गावात दारूविक्री बंद आहे.

सध्या देशात लॉकडाउन सुरू असून दारू व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवरही बंदी आहे. या नियमांची अंमलबाजवणी व्हावी, यासाठी मुक्तीपथ तालुका चमू सातत्याने जनजागृती करीत आहे. यासाठी पोस्टर तयार करण्यात आले आहेत. ते लोकांनी वाचून तशी कृती करावी यासाठी सर्व पोस्टर दर्शनी भागात लावले जात आहे. हा संदेश गावातील प्रत्येक घरात पोहोचावा यासाठी येथील मुक्तीपथ गाव संघटनेच्या महिलांनी पुढाकार घेत दारूबंदीसाठी गावात फिरत पोस्टरद्वारे जनजागृती केली. तसेच स्वतः चे, कुटुंबाचे आणि गावाचे रक्षण करा, असा संदेश दिला. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमही या महिलांनी काटेकोरपणे पाळले. मुक्तीपथ चमूच्या पुढाकाराने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावागावांमध्ये गाव संघटनांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. सोबतच व्यसनापासून दूर राहत सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहनही केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.