गडचिरोली - नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्यात कोणतीही निवडणूक असो, पोलीस प्रशासनासमोर ते मोठे आव्हान असते. निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस विभागाची मोठी भूमिका असते. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 361 ग्रामपंचायतीत निवडणुका पार पडणार आहेत. जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान पार पडणार असून पहिल्या टप्प्यात 15 जानेवारी, तर 20 जानेवारीला दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. संवेदनशील भागात पोलिंग पार्ट्या हेलिकॉप्टरद्वारे रवाना करण्यात आल्या असून, दोन हेलिकॉप्टर पोलिसांच्या मदतीला राहणार आहेत.
हेही वाचा - कोरोना लसीकरणाच्या शुभारंभ दिनी गडचिरोली जिल्ह्यातील 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस
दोन टप्प्यात मतदान-
उत्तर गडचिरोलीतील गडचिरोली, कोरची, आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज, धानोरा या 6 तालुक्यातील 198 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 13 ग्रामपंचायतीत बिनविरोध निवड झाली आहे. तर, पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष 170 ग्रामपंचायतीत मतदान पार पडणार आहे. एकही अर्ज सादर न केलेल्या ग्रामपंचायतीत धानोरा तालुक्यातील 2 ग्रामपंचायती आहेत. मतदानासाठी पोलिंग पार्टीला नेण्यासाठी पोलिसांच्या मदतीला दोन हेलिकॉप्टर मिळाले असून त्यांच्याच माध्यमातून पोलिंग पार्ट्यांना मतदान केंद्राच्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
565 मतदान केंद्र-
दुसऱ्या टप्प्यात २० जानेवारीला अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मूलचेरा, चामोर्शी या तालुक्यात मतदान होणार आहे. या सहा तालुक्यातील ग्रामपंचायती जास्त संवेदनशील असल्याने या भागात निर्विघ्नपणे निवडणूक पार पाडण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. जिल्ह्यात 565 मतदान केंद्र असून दीडशेहून अधिक मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत.
हेही वाचा - जर भ्रष्टाचार झाला असेल तर निश्चित कारवाई होणार - नगरविकास मंत्री शिंदे