ETV Bharat / state

सरत्या वर्षात घडल्या २३ चकमकी; ९ नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांना यश

author img

By

Published : Dec 31, 2019, 9:08 PM IST

Updated : Dec 31, 2019, 9:38 PM IST

२०१९ या वर्षात नक्षलवाद्यांनी घातपाताच्या दृष्टीने पेरून ठेवलेले एकूण १४१.५०० किलोग्रॅम वजनाचे लॅन्डमाईन्स आणि क्लेमोर माईन्स जप्त करण्यात यश आल्याने, अनुचित प्रकार टाळण्यास पोलीस दल यशस्वी ठरले.

gadchiroli
पोलीस जवान

गडचिरोली- नक्षल कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सरत्या वर्षात तब्बल २३ नक्षल-पोलीस चकमकी घडल्या. यात ९ नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर वर्षभरात ३४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळ बॅकफूटवर गेल्याचे दिसून येते.

माहिती देताना गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे

२०१९ या वर्षात नक्षलवाद्यांनी घातपाताच्या दृष्टीने पेरून ठेवलेले एकूण १४१.५०० किलोग्रॅम वजनाचे लॅन्डमाईन्स आणि क्लेमोर माईन्स जप्त करण्यात यश आल्याने, अनुचित प्रकार टाळण्यास पोलीस दल यशस्वी ठरले. यावर्षी गडचिरोली पोलीस दलाने दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे (डीकेएसझेडसी) सदस्य असलेल्या आणि जहाल नक्षलवादी असलेल्या उप्पगुंटी निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदा आणि तिचा पती राणी सत्यनारायण उर्फ किरण याच्यासहीत एकूण ७४ लाख बक्षिस जाहीर असलेल्या २२ नक्षलवाद्यांना अटक करण्यात यश मिळविले. यामध्ये दोन डीकेएसझेडसी सदस्य, एक दलम कमांडर, चार दलम सदस्य, आणि १३ पार्टी सदस्यांचा सामावेश आहे.

अतिशय प्रभाविपणे नक्षलविरोधी अभियान राबविण्याबरोबरच अतिदुर्गम व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी आणि आदिवासी बांधवांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने यावर्षी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतले. या सर्व उपक्रमांस गडचिरोलीतील जनतेने उदंड असा प्रतिसाद दिला. यावर्षी गडचिरोली पोलीस दलाने एकूण २१० जनजागरण मेळावे आयोजित करून गडचिरोलीतील ६० हजार नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्याचे काम केले. त्याचबरोबर १,६८८ ग्रामभेटी आयोजित करून ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या १,४८६ समस्या समजावून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी संबंधीत विभागांना पत्रव्यवहारही करण्यात आला. यातील ३०७ समस्या तात्काळ सोडविण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले.

५४ आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा..

३ फेब्रुवारी २०१९ रोजी आलापल्ली, अहेरी येथे ५४ आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पाच आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांचा सहभाग होता. आदिवासी बांधवांच्या कलेला वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'आदिवासी रेला' नृत्य स्पर्धेत एकूण २९ हजार १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. तरुणांमधून उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी त्यांच्यासाठी 'बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा' आणि 'वीर बाबुराव शेडमाके कबड्डी' या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये १७ हजार ६३८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या बांधापर्यंत पोहचावे या उद्देशाने ५८ ठिकाणी वीर बाबुराव शेडमाके कृषी मेळावे आयोजित करण्यात आले. यामध्ये मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

दारू विक्रीला आळा..

नक्षलविरोधात प्रभाविपणे अभियान राबविण्याबरोबरच गडचिरोली जिल्ह्यातील दारू विक्रीला आळा घालण्यासाठी १,६६२ केसेस दाखल केल्या असून, ६ कोटी ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. जिल्ह्यातील ३२४ दारू विक्रेत्यांवर दारूबंदी कायद्याचे कलम ९३ नुसार प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. तर २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच काहीही अघटित न घडता निवडणुका निर्विघ्नपणे पार पडल्या. २०२० मध्येही नक्षलवाद्यांवर वचक कायम ठेवण्याचा आशावाद जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- भामरगड नगरपंचायतीच्या दोन प्रभागातील पोटनिवडणुक शांततेत; सोमवारी मतमोजणी

Intro:सरत्या वर्षात घडल्या २३ चकमकी ; ९ नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांना यश

गडचिरोली : नक्षल कारवायांसाठी प्रसिद्ध गडचिरोली जिल्ह्यात सरत्या वर्षात तब्बल 23 नक्षल-पोलीस चकमकी घडल्या. यात 9 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले. तर वर्षभरात 34 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळ बॅकफूटवर गेल्याचे दिसून येते.Body:2019 या वर्षात नक्षलवाद्यांनी घातपाताच्या दृष्टीने पेरून ठेवलेले १४१.५०० किलोग्रॅम वजनाचे लॅन्डमाईन्स, क्लेमोर माईन्स जप्त करण्यात यश आल्याने अनुचित प्रकार टाळण्यास पोलीस दल यशस्वी ठरले. यावर्षी गडचिरोली पोलीस दलाने दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे सदस्य असलेल्या जहाल नक्षलवादी असलेल्या उप्पगुंटी निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदा व तिचा पती राणी सत्यनारायना ऊर्फ किरण याच्यासहीत एकुण ७४ लाख बक्षीस जाहीर असलेल्या २२ नक्षलवाद्यांना अटक करण्यात यश मिळविले. यामध्ये डि. के, एस. झेड. सी. मेंबर ०२, दलम कमांडर ०१, दलम सदस्य ०४, पार्टी मेंबर १३ यांचा सामावेश आहे.

अतिशय प्रभाविपणे नक्षलविरोधी अभियान राबविण्याबरोबरच अतिदुर्गम व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी, आदिवासी बांधवांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने यावर्षी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतले. यासर्व उपक्रमास गडचिरोलीतील जनतेने उदंड असा प्रतिसाद दिला. यावर्षी गडचिरोली पोलीस दलाने एकुण २१० जनजागरण मेळावे आयोजित करुन गडचिरोलीतील ६० हजार नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्याचे काम केले. त्याच बरोबर १६८८ ग्रामभेटी आयोजित करून ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष भेटी घेवुन त्यांच्या १४८६ समस्या समजावून घेत त्या सोडविण्यासाठी संबंधीत विभागांना पत्रव्यवहार केला. यातील ३०७ समस्या तात्काळ सोडविण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले.

३ फेब्रुवारी २०१९ रोजी आलापल्ली, अहेरी येथे ५४
आदिवासी जोडप्यांचा सामुहीक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ०५ आत्मसमर्पित जोडप्यांचा सहभाग होता. आदिवासी बांधवांच्या कलेला वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी रेला नृत्य स्पर्धेत एकूण २९ हजार १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. तरूणांमधुन उत्कृष्ट खेळाडु घडविण्यासाठी त्यांच्यासाठी बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा, वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यामध्ये १७ हजार ६३८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांसाठी आधनिक तंत्रज्ञान त्यांच्या बांधापर्यंत पोहचावे या उद्देशाने ५८ ठिकाणी वीर बाबराव शेडमाके कृषी मेळावे आयोजित करण्यात आले. या मध्ये मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

नक्षलविरोधात प्रभाविपणे अभियान राबविण्याबरोबरच गडचिरोली जिल्हयातील दारू विक्रीला आळा घालण्यासाठी १६६२ केसेस दाखल केल्या असुन ६ कोटी ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हयातील ३२४ दारू विक्रेत्यांवर दारूबंदी कायद्याचे कलम ९३ नुसार प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. तर २५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच निवडणुका कहीही अघटित न घडता निर्विघनपणे पडल्या पार. 2020 मध्येही नक्षलवाद्यांवर वचक कायम ठेवण्याचा आशावाद जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला.
Conclusion:सोबत व्हिज्युअल व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा बाईट आहे
Last Updated : Dec 31, 2019, 9:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.