ETV Bharat / state

गडचिरोली पोलीस दलातर्फे 317 दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ - specially able schemes Gadchiroli police help

कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू आदिवासी नागरिकांना मिळावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाने पुढाकार घेत काल तब्बल 317 दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला.

Gadchiroli police help specially able
दिव्यांग मदत गडचिरोली पोलीस
author img

By

Published : Feb 14, 2021, 1:37 AM IST

गडचिरोली - गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाही. या कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू आदिवासी नागरिकांना मिळावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाने पुढाकार घेत काल तब्बल 317 दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला.

माहिती देताना पोलीस अधीक्षक अंकित गोयल

हेही वाचा - नापिकीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

समाजकल्याण, आरोग्य, परिवहन विभागाचे सहकार्य

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने समाजकल्याण विभाग, परिवहन विभाग व आरोग्य विभाग गडचिरोली यांच्या सहकार्याने काल एकलव्य हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते ३१७ दिव्यांग नागरिकांना मोफत युडीआयडी प्रमाणपत्र, मोफत बस सवलत पास, तसेच संजय गांधी निराधार योजनेची माहिती देवून फॉर्म भरून घेण्यात आले.

Gadchiroli police help specially able
पोलीस दलातर्फे दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ

लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न - अंकित गोयल

शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. परंतु, गडचिरोली सारख्या भागात रस्ते व वाहतुकीची सोय नसल्याने त्या लोकांपर्यंत पोहचवण्यास अडचन येते. त्या योजना आदिवासी नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरिता पोलीस विभागाकडून फक्त योजनांची माहिती देणे एवढेच कर्तव्य नसून त्यांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करीत आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. तसेच, गोयल यांनी आदिवासी जनतेसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे (अहेरी), डॉ. इंद्रजीत नागदेवते (फिजीशियन), डॉ. नरेश बिडकर (अस्थिरोग तज्ञ), डॉ. कांबळे (कान, नाक, घसा तज्ञ), निलेश तोरे (समाजकल्याण निरीक्षक) व मंगेश पांडे (आगार व्यवस्थापक) उपस्थित होते.

हेही वाचा - पंचतारांकित हॉटेल नव्हे, हे तर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आयसीयू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.