ETV Bharat / state

पोलिसांच्या 'रोजगार' अॅपने आदिवासींना मिळणार रोजगार - नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील सावली

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील सावली येथे पोलीस विभागातर्फे जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात सावली, मसेली, कोरची, झेंडेपार, मुरकुटी, बिजेपार, कोटरा, जांभळी, दोडके, नवेझरी, लक्ष्मीपूर या गावांतील ४ ते ५ हजार नागरिकांनी सहभाग घेतला.

गडचिरोली जनजागरण मेळावा
author img

By

Published : Sep 18, 2019, 10:59 PM IST

गडचिरोली - नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील सावली येथे पोलीस विभागातर्फे जनजागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी पोलीस दलाने जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी विकसित केलेल्या 'रोजगार मेळावा' या अॅपबद्दल माहिती दिली.

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील सावली येथे पोलीस विभागातर्फे जनजागरण मेळावा घेण्यात आला

या अॅपमध्ये गरजू तरूण आपल्या आवडीच्या नोकरी संदर्भात माहिती भरू शकतात. याचा बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या अॅपमध्ये कंपन्यांनादेखील आपली नाव नोंदणी करता येणार आहे. अप्पर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात सावली, मसेली, कोरची, झेंडेपार, मुरकुटी, बिजेपार, कोटरा, जांभळी, दोडके, नवेझरी, लक्ष्मीपूर या गावांतील ४ ते ५ हजार नागरिकांनी सहभाग घेतला.

हेही वाचा - वसतीगृहाच्या मागणीसाठी अमरावतीत विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण

नक्षलवादी आपल्या फायद्यासाठी आदिवासी बांधवांच्या मुलांना शिक्षण घेण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवतात. याकडे आदिवासी बांधवांनी गांभीर्याने पहावे व आपल्या मुलांना शाळेत पाठवावे, असे अप्पर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी आवाहन केले.
मेळाव्यात उपस्थित असलेल्या नक्षलग्रस्त भागातील दिव्यांग व्यक्तिंना सायकल, शिलाई मशीन, अँड्रॉइड मोबाईल, भांडी, कपडे, तरुणांसाठी खेळाचे साहित्य, पाण्याची टाकी या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याच दरम्यान महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा, तरुणांसाठी हॉलीबॉल स्पर्धा, कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या सर्व स्पर्धांमध्ये पुरुष व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

Intro:पोलिसांच्या 'रोजगार' अँपने आदिवासींना मिळणार रोजगार

गडचिरोली : पोलीस स्टेशन कोरची हद्दीतील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील सावली येथे पोलीस विभागातर्फे जनजागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी पोलीस दलाने जिल्ह्यातील बेरोजगार तरुण तरुणीकरिता विकसित केलेल्या "रोजगार मेळावा"या अँपबद्दल माहिती दिली. ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे ते आपली सर्व माहिती तसेच आपल्या आवडीच्या नोकरीसंदर्भात माहिती भरू शकतात. यामुळे बेरोजगार तरुण तरुणींना नोकरी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.Body:अप्पर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या उपस्थितीत मेळाव्याला सावली, मसेली, कोरची, झेंडेपार, मुरकुटी, बिजेपार, कोटरा, जांभळी, दोडके, नवेझरी, लक्ष्मीपूर येथील ४ ते ५ हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी मार्गदर्शन करताना नक्षलवादी आपल्या फायद्यासाठी आदिवासी बांधवांच्या मुलांना शिक्षण घेण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवतात. याकडे सर्वांनी गांभीर्याने पाहावे व मुलांना शाळेत पाठवावे, असे आवाहन केले. तसेच गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्यातील बेरोजगार तरुण तरुणीकरिता विकसित केलेल्या "रोजगार मेळावा"या अँपबद्दल त्यांनी माहिती दिली.

गडचिरोली पोलीस दलाने बेरोजगार मुलांसाठी नवीन अँप विकसित केले आहे. यामध्ये ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे ते आपली सर्व माहिती तसेच आपल्या आवडीच्या नोकरीसंदर्भात माहिती भरू शकतात. या अँप मध्ये कंपन्यांना देखील आपली नावनोंदणी करता येणार आहे . यामुळे बेरोजगार तरुण तरुणींना नोकरी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. मेळाव्यात उपस्थित असलेले नक्षलपीडित नागरिक,अपंग तसेच गरजूंना सायकल, शिलाई मशीन, अँड्रॉइड मोबाईल, तीन चाकी सायकल, भांडी, कपडे, तरुणांसाठी खेळाचे साहित्य, पाण्याची टाकी, तसेच जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा, तरुणांसाठी हॉलीबॉल स्पर्धा, कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या सर्व स्पर्धामध्ये पुरुष व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.त्याचबरोबर उपस्थितांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.