ETV Bharat / state

गडचिरोली : महिलांनी जंगलात भर पावसात पाठलाग करून पकडला दारूने भरलेला ट्रॅक्टर

महिलांनी भर पावसात जंगलामध्ये गाडीचा पाठलाग केला. महिला पाठलाग करत असल्याचे पाहताच ट्रॅक्टरवरील सर्व जण दारूने भरलेला ट्रक्टर तेथेच सोडून दुसऱ्या वाहनाने पसार झाले.

दारूने भरलेला ट्रॅक्टर
author img

By

Published : Jul 5, 2019, 1:54 PM IST

गडचिरोली - दारूबंदी असली तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री होत आहे. हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अवैध दारू विक्री रोखण्यासाठी पोलिसांसह गावातील महिलांच्या संघटनाही पुढे सरसावल्या आहेत. मुरूमगावातील महिलांनी गुरुवारी दारूने भरलेला ट्रॅक्टरचा पाठलाग करत लाखो रुपयांची दारू पकडली आहे.

महिलांनी पकडला दारूने भरलेला ट्रॅक्टर

मुरुमगावात दारूविक्रीला बंदी आहे. गावात मुक्तीपथचे गावसंघटन स्थापन झाले असून महीला दररोज गावात दारूविक्रेत्यांवर लक्ष ठेवत असतात. तरीदेखील गावात दारू विक्रीस येते. हे लक्षात आल्यावर महिलांनी दारूची पाळेमुळे शोधण्याचे ठरवले. बुधवारी रात्री एक पांढरी पीकअप गाडी आणि ट्रक्टर संशयास्पद वाटली. त्यामुळे महिलांनी दोन्ही गाड्यांचा पाठलाग केला. पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी जवळच्या रीडवाही उमरपालच्या जंगलाच्या दिशेने नेली.

महिलांनी भर पावसात जंगलामध्ये गाडीचा पाठलाग केला. पाठलाग करत असल्याचे पाहताच सर्वजण दारूने भरलेला ट्रक्टर तेथेच सोडून दुसऱ्या वाहनाने पसार झाले. याबाबतची माहिती महिलांनी पोलिसांना दिली. मात्र, पोलीस न आल्याने महिलांनीच रात्रभर या दारूला पहारा देण्याचे ठरवले. पंरतु, पाऊस जास्त असल्याने त्या पहाटे घरी गेल्या आणि यानंतर पुन्हा सकाळी पोलीस येईपर्यंत घटनास्थळी पोहोचून थांबल्या होत्या.

सकाळी दारू साठ्याकडे महिला गेल्या असता, दारू पीकअपमध्ये पुन्हा भरून नेत असल्याचे त्यांना दिसले. याचाही विरोध करत महिलांनी दुसऱ्यांदा दारू नेण्याचा डाव हाणुन पाडला. यावेळी चालकाने महीलांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रतिकाराने चालक पळून गेला. मुरुमगाव पोलीस मदत केंद्राने सकाळी पकड्लेल्या दारू व वाहनाचा पंचनामा केला.

महिलांनी तब्बल २ हजार ७३० दारूच्या बाटल्यांचा साठा पकडला. यावेळी सरपंच प्रियांका कुंजाम, सायरा शेख, प्रतिभा उइके, अविका आचला, नीरजा कुंजाम, आसोबाई पिद्दा, अनारबाई पिद्दा, लिलाबाई भुरकुरीया, बुधाबाई भोयर, पुश्पाबाइ कारेवार, शहीदा पठाण, मुनीर शेख, संगीता पोया यांसह मुक्तिपथ गावसंघटनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Intro:गडचिरोलीतील मुरूमगावच्या महीलांनी पकडला दारू भरलेला ट्रॅक्टर

गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होतो, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अवैध दारू विक्री रोखण्यासाठी पोलिसांसह गाव संघटनेच्या महिलाही पुढे सरसावल्या आहेत. गुरुवारी मुरूमगाव येथील महिलांनी चक्क दारूने भरलेल्या ट्रॅक्टर पकडून लाखो रुपयांची दारू जप्त केली.Body:मुरुमगाव हे दारुविक्री बंदी असलेले गाव आहे. गावात मुक्तीपथचे गावसंघटन स्थापन झाले असुन महीला दररोज गावात दारुविक्रेत्यांवर लक्ष ठेवत असतात. तरी देखील गावातुन दारुचा पुरवठा होतो हे लक्षात आल्यावर महीलांनी दारुची पाळेमुळे शोधन्याचे ठरवले. त्यानुसार बुधवारी रात्री एक पांढरी पीक अप गाडी महिलांना संशयास्पद वाटली. महीलांनी त्या गाडीचा पाठलाग सुरु केला. महीला आल्याचे लक्षात येताच त्याने गाडी सुसाट वेगाने जवळच्या रीडवाही उमरपाल च्या जंगलाच्या दिशेने गाडी नेली. महीलांनी भर पावसात त्या गाडीचा पाठलाग केला व त्या ठिकाणी महीलांना पाहताच दुसय्रा एका गाडीतुन काही लोक गाडी तेथेच ठेऊन पळाले. तेथुन बाजुला महीलांना दारुने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली दिसुन आले. महीलांनी रात्रभर या दारुला पहारा दिला. व सकाळी सदर घटनेची माहीती पोलिसांना दिली. रात्र असल्याने पोलिस येउ शकले नाहीत.

महीलांनी वाढत्या पावसामुळे पहाटे घरी जाऊन पुन्हा यायचे ठरवले व त्या घरी गेल्या. काही वेळाने त्यांनी पुन्हा येउन पाहीले असता त्यातील दारु पिक अप वाहणाने दुसरीकडे नेली जात होती. नाल्यावर असलेल्या गुडघाभर पाण्यातुन महीलांनी पिक अप पकडली. त्यामध्ये असलेला व्यंकटेश बहीरवार एवढ्या वेळी मला माफ करा असे म्हणाला. महीलांनी नकार देता क्षणी त्याने महीलांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. व तो तेथुन पसार झाला. महीला पुन्हा दारु साठ्याच्या ठिकाणी आला. मुरुमगाव पोलिस मदत केंद्राने सदर ठिकाणावर पकड्लेल्या दारु व वाहणाचा पंचनामा केला. यामध्ये रोमीओ लिहीलेल्या 2 हजार 730 दारुच्या बाटल्या आढळुन आल्या. यावेळी सरपंच प्रियांका कुंजाम, सायरा शेख, प्रतिभा उइके, अविका आचला, नीरजा कुंजाम, आसोबाई पिद्दा, अनारबाई पिद्दा, लिलाबाई भुरकुरीया, बुधाबाई भोयर, पुश्पाबाइ कारेवार, शहीदा पठाण, मुनीर शेख, संगीता पोया यांसह मुक्तिपथ गावसंघटनेच्या महीला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Conclusion:व्हिज्युअल चांगले असून ते पूर्ण वापरावे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.