गडचिरोली - महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्याचा निकाल ५४.६५ टक्के लागला आहे. गडचिरोली येथील प्लॅटिनम जुबली हायस्कूलची विद्यार्थिनी मयुरी रामटेके हिने ९४.४० टक्के गुण घेत जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले आहे.
२०१८ मध्ये जिल्ह्यात दहावीच्या निकालाची टक्केवारी ८२.२ टक्के होती. २०१९ मध्ये हा निकाल तब्बल ३१ टक्क्यांनी घटून ५४.६५ टक्क्यांवर आला. केवळ ९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, यामध्ये सेंट फ्रान्सीस इंग्लीश मिडीयम स्कूल नागेपल्ली, ग्लोबल मिडीया केरला मॉडेल इंग्लीश स्कूल अहेरी, मॉडेल स्कूल आलापल्ली, कार्मेल अकॅडमी हायस्कूल चामोर्शी, अनुसूचित जाती विद्यालय मुलींची शासकीय शाळा सिरोंचा, ज्ञानदीप इंग्लीश मिडीयम स्कूल सिरोंचा, गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली, एकता निवासी मुकबधीर शाळा गडचिरोली या शाळांचा समावेश आहे.
शून्य टक्के निकाल देणाऱ्या शाळा
संत गाडगे महाराज माध्य. शाळा गुम्मलकोंडा पॅच ता. सिरोंचा, ईश्वरचंद विद्यासागर माध्यमिक विद्यालय मोहुर्ली ता. मुलचेरा, शिवानी पोस्ट बेसिक आश्रमशाळा पावीमुरांडा ता. चामोर्शी, राजे धर्मराव हायस्कूल मन्नेराजाराम ता. भामरागड, राजे धर्मराव माध्यमिक आश्रमशाळा मन्नेराजाराम ता. भामरागड या शाळांचा समावेश आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेला जिल्हाभरातून एकूण १५ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी रजिस्टेशन केले होते. त्यापैकी १४ हजार ११६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ७५८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. ३ हजार ३५६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ हजार ६५१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ४१५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
अनेक आश्रमशाळा निकालात मागे
आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच खासगी शाळांचा निकाल चांगला लागला. तर गडचिरोलीसह दक्षिण भागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा मागे राहिल्याचे दिसून आले आहे.
पेरमिली येथील शासकीय माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळेचा निकाल शून्य टक्के लागला. खमनचेरु शासकीय आश्रमशाळा ७.५० टक्के, राजे धर्मराव माध्यमिक आश्रमशाळा वेलगूर ७.६९, शासकीय आश्रमशाळा हालेवारा ६.४५, शासकीय आश्रमशाळा कोठी-५.२६, शासकीय आश्रमशाळा लाहेरी ११.११, राजे धर्मराव आश्रमशाळा रेगडी ७.४०, भगवंतराव आश्रमशाळा एटापल्ली-९.०९, शासकीय आश्रमशाळा ताडगाव १०.५२, भगवंतराव आश्रमशाळा मुलचेरा १०.६३, अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा चांदाळा १२.९२, शासकीय आश्रमशाळा रेगडी १६.६६, शासकीय आश्रमशाळा गोडलवाही १३.६३, शासकीय आश्रमशाळा पेंढरी १३.७२, महादेवगड माध्यमिक आश्रमशाळा अरततोंडी १७.०७, शासकीय आश्रमशाळा मुरुमगाव २०.५८, अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा मुरमाडी २५, शासकीय आश्रमशाळा पोटेगाव २५, इंदिरा गांधी माध्यमिक आश्रमशाळा सुकाळा २५ टक्के या कमी निकाल लागलेल्या शाळांपैकी काही आश्रमशाळा आहेत.
तालुका निहाय निकालाची टक्केवारी
गडचिरोली ६१.९९ टक्के
आरमोरी ६२.१५ टक्के
अहेरी ५३.९३ टक्के
भामरागड २६.१६ टक्के
चामोर्शी ५६.७० टक्के
देसाईगंज ६२.०५ टक्के
धानोरा ५१.९४ टक्के
एटापल्ली २६.२६ टक्के
कोरची ६२.२१ टक्के
कुरखेडा ५५.६७ टक्के
मुलेचरा ३८.५२ टक्के
सिरोंचा ५९.३८ टक्के