गडचिरोली - कोरोना काळात वीज बिलात सवलत देण्याची भूमिका घेऊन महाविकास आघाडी सरकारने घुमजाव केल्याचा आरोप आमदार डॉ. देवरा होळी यांनी केला. त्यामुळे विरोधी पक्ष भाजपने सरकारचा निषेध करण्यासाठी आज टाळे ठोके आंदोलन केले.
भाजपने गडचिरोली येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयापुढे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी वीज कार्यालयाला टाळे ठोकत निषेध व्यक्त केला.
हेही वाचा-'राज्य सरकारच्या हट्टामुळे 739 मराठा विद्यार्थ्यांचे भविष्य धूसर'
वीज बिल माफीचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर-
सर्वसामान्य ग्राहकांना हजारो रुपयांचे वीज बिले. त्यामुळे त्यांना भरणा करणे अवघड होत आहे. अशातच महावितरण कंपनीने कठोर भूमिका घेत अशा ग्राहकांची वीज कापण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं लोकांत असंतोष निर्माण झाला आहे. आमदार डॉ. देवरा होळी म्हणाले की, भाजपने वीजबिल माफीच्या मुद्द्यांवर हे आंदोलन केले आहे. शब्द न पाळणाऱ्या सरकारविरोधात महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना कोरोनाच्या काळात अतोनात बिल आले आहे. वीज बिल माफ करण्याचा नियम सरकारने पाळावा, अशी मागणी आमदार होळी यांनी केली आहे.
हेही वाचा-भंडाऱ्यात इंधन दरवाढीविरुद्ध शिवसेनेचे, तर वीज बिलासाठी भाजपाचे आंदोलन
दरम्यान, शिवसेने इंधनदरवाढीविरोधात राज्यभरात आंदोलन केले आहे.