ETV Bharat / state

कौतुकास्पद ! अशिक्षित आदिवासींनी बनवले विना नट बोल्टचे 'मासेमारी यंत्र' - Fishing machine made by tribes at gadchiroli

ज्ञान फक्त शाळेतच मिळते असे नाही, तर ते निसर्गातही मिळत असते. याचा प्रत्यय गडचिरोलीतील भामरागड येथे आला आहे. येथील अशिक्षित आदिवासी बांधवांनी विना नट बोल्टचे 'मासेमारी यंत्र' बनवले आहे.

अशिक्षित आदिवासींनी बनवले मासेमारी यंत्र
author img

By

Published : Nov 25, 2019, 12:10 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील अतिमागास व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यात एक विस्मयकारक प्रयोग पहायला मिळाला आहे. या ठिकाणी भौतिक स्वरूपातील हवे ते नवे तंत्रज्ञान आजही पोहचलेले नाही. मात्र येथील अशिक्षित आदिवासींनी आपल्या कल्पकतेचा वापर करून मासे पकडण्यासाठी ग्रामीण तंत्रज्ञानातून विना नट बोल्टचे मासेमारी यंत्र विकसित केले आहे.

अशिक्षित आदिवासी बांधवांनी बनवले विना नट बोल्टचे मासेमारी यंत्र...

हेही वाचा... अजित पवार दिशाभूल करत आहेत; भाजपसोबत आघाडीचा प्रश्नच नाही, शरद पवारांचा पलटवार

भामरागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल असून येथील शेतकरी काही प्रमाणात धान करतात. जंगलातून वाहणाऱ्या नाल्यात बारमाही पाणी राहत असल्याने अनेक जण मासेमारी करतात. शेतातून वाहणारे नाल्यातील प्रवाहात मासे पकडण्यासाठी येथील आदिवासी बांधवांनी ग्रामीण तंत्रज्ञानाचा वापर करत मासेमारी यंत्र बनवले आहे.

हेही वाचा... अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा

या भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबुचा वापर यासाठी त्यांना केला आहे. या बांबुपासून बनवलेली जाळी, नाल्यात अडवुन ठेवली जाते. संध्याकाळपर्यंत यात अलगदरित्या मासे अडकले जातात. या भागातील आदिवासी पावसाळ्यात दररोज मासेमारी करतात. मात्र नाल्यातील पाण्यातील मासे पकडण्यासाठी त्यांना मेहनत करावी लागते.

हेही वाचा... अजितदादांनी साहेबांचा निर्णय मान्य करुन स्वगृही परत यावं - रोहित पवार

हे शेतकरी पावसाळ्यात आणि त्यानंतर नाल्यात पकडलेले मासे, घरची रोजची गरज भागल्यानंतर उरलेले मासे भाजून अथवा सुकवून ठेवतात. उन्हाळ्यात त्यांना जेव्हा भाजीपाल्याची समस्या उद्भवते तेव्हा या वाळवलेल्या माशांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. या आदिवासी बांधवांनी कोणत्याही ज्ञानी वैज्ञानिकाकडून घेतलेल्या ज्ञानातून हा अविष्कार घडवून आणलेला नाही, तर निसर्गतः मिळालेल्या ज्ञानातून त्यांनी हे नट बोल्ट नसलेले मासेमारी यंत्र बनवलेले आहे.

हेही वाचा... शरद पवार आपल्यासोबत ठामपणे, चिंता करण्याचे कारण नाही - उद्धव ठाकरे

Intro:गडचिरोली : अतिमागास व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यात आजही नवे तंत्रज्ञान पोहचले नाही. मात्र येथील अशिक्षित आदिवासींनी आपल्या कलेचा वापर करून मासे पकडण्यासाठी ग्रामीण तंत्रज्ञानातून विना नट बोल्टचा मासेमारी यंत्र विकसित केलं आहे. हा मासेमारी यंत्र वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहे.Body:भामरागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल असून काही प्रमाणात धान शेती केली जाते. जंगलातून वाहणाऱ्या नाल्यात बारमाही पाणी राहत असल्याने अनेक जण मासेमारी करतात. शेतातून वाहणारे नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात मासे पकडण्यासाठी येथील आदीवासी शेतकरी बांधवांनी ग्रमीण तंत्रज्ञानाचा उपयोग करुन या भागात मुबलक उपलब्द असलेल्या बांबुने बनविलेले जाळी ,नल्यात अडवुन टाकुन ठेवतात. सायंकाळ पर्यंत अडकलेले मासे घेऊन जातात. पावसाळ्यात दररोज मासे मारी करतात. मात्र फक्त एकवेळा मेहनतीने नालाअडवुन पाण्याची प्रवाहात जाळी बसविण्यासाठी कसरत करावी लागते. नंतर पावसाळ्यात नल्यातील पाणीअटे पर्यंत मासे मिळतात. मिळालेली मासे घरी भाजी करतांना उरलेले मासे तनसमधे भाजून शेकोटीवर वाढवतात. उन्हाळ्यात भाजीपाला समस्या उद्भवते तेव्हा वाळवलेल्या मासांचा भाजीसाठी उपयोग होतो. हा कुठुन ज्ञानी वैज्ञानिक कडून घेतलेला ज्ञान नव्हे तर स्वतः या भागतील आदीवासी बांधवांनी डोकं लडवुन बनविलेला विना नटबोल्ट मासे मारी यंत्र सर्व ज्ञनी लोकांना आकर्षित करत आहे .Conclusion:फोटो विजुवल्स ,आदीवासी शेतकर्यांचा बाईट म्हणुन नाही विजुवल म्हणुन घ्यायच ही विनंती .

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.