गडचिरोली- जिल्ह्यातील भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीवर एक दोन महिन्यांपासून पुलाचे निर्माण कार्य सुरू आहे. सदर कमावरील असलेल्या पोकलाईन मशीनला बुधवार रात्रीच्या दरम्यान १२.३० ते १.०० वाजताच्या दरम्यान आग लागली. कोणीतरी ही आग मुद्दामून आग लावून पोकलाईन मशीन जळण्याच्या प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
चौकीदार पाणी पिण्यास गेल्यानंतर प्रकार
पर्लकोटा नदी पुलाच्या बांधकामावर कंत्राटदारांनी सात ते आठ पोकलेन व जेसीबीने मागील महिण्यापासून जोमाने कामाला सुरुवात झाली आहे. बुधवार दिवसभर काम केल्यानंतर सात पोकलेन नदीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. तिथे चौकीदार होते. मात्र. रात्री १२.३० ते १.०० वाजताच्या सुमारास चौकीदार पाणी पिण्यासाठी किनाऱ्यावर असलेल्या कॅम्पमध्ये गेला होता. तेव्हाच अज्ञात व्यक्तीने पोकलाईनला आगा लावली.
हेही वाचा- Antilia Explosives Scare : फॉरेन्सिक टीमकडून गाड्यांची तपासणी सुरु
नक्षलग्रस्त भाग असल्याने कंत्राटदारांचा काम करण्यास नकार
भामरागडलगतच्या पर्लकोटा नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो त्यामुळे संपुर्ण बाजारपेठ पाण्याखाली जाते. परिणामी अनेक दिवस मार्ग बंद पडून वाहतूक ठप्प होते. जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी २० वर्षांपासून नवीन पुलाची मागणी रेटून धरली होती. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांनी भामरागडला भेट देवून पर्लकोटेवरील पुल मंजूर केला होता. मात्र, हा नक्षलग्रस्त भाग असल्याने कोणीही कंत्राटदार सदर काम करायला धजावत नव्हता. बऱ्याच कालावधीनंतर कंत्राटदार मिळाला व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. ही तालुकावासीयांसाठी आनंदाची पर्वणी होती. मात्र, अज्ञात इसमाने कामावरील पोकलनला आग लावल्याने सर्व भामरागड तालुक्यातील नागरिकांनी जिथे तिथे तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी भामरागड पोलीस स्टेशनला घटनेची तक्रार दाखल केली आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रातील दुसरी लाट पहिल्या कोरोना लाटेपेक्षा भयानक असणार - डॉ.अविनाश भोंडवे