गडचिरोली - आरमोरीवरून गडचिरोलीकडे येत असलेल्या धावत्या ओमनी गाडीला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास काटली गावात घडली. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन वेळीच थांबविल्याने मोठी दुर्घटना टळली.
गडचिरोली येथील खाटिक व्यवसायिक आरमोरी येथून शेळ्या विकत घेऊन ओमनी गाडीने गडचिरोलीकडे घेऊन जात होता. दरम्यान आरमोरी-गडचिरोली मार्गावरील काटली गावात गाडीला अचानक आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच वाहन थांबवून गाडीतील बकऱ्यांना बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र ओमनी गाडी जळून खाक झाली. हा थरार बघण्यासाठी काटली येथील नागरिकांची गर्दी जमली होती. या घटनेमुळे नागपूर मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.