ETV Bharat / state

गडचिरोलीत वकीलांचे बेमुदत कामबंद आंदोलन; अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची मागणी

अहेरी हा स्वतंत्र जिल्हा आहे. त्याच धर्तीवर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची मागणी सुरू आहे. यासाठी अहेरी उपविभागातील सर्वच तालुका स्थानी असलेल्या वकील संघांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

author img

By

Published : Feb 1, 2020, 11:29 AM IST

Updated : Feb 1, 2020, 1:06 PM IST

establish another district session court in gadchiroli
गडचिरोलीत वकीलांचे बेमुदत कामबंद आंदोलन

गडचिरोली - जिल्ह्यातील अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी वकील संघाने 27 जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले आहे. अहेरी-सिरोंचा येथील वकिलांनी केलेल्या या आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम दिसून येत आहे. तर या आंदोलनाला भाजपने समर्थन दिले आहे.

गडचिरोलीत वकीलांचे बेमुदत कामबंद आंदोलन; अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची मागणी

अहेरी हा स्वतंत्र जिल्हा आहे. त्याच धर्तीवर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची मागणी सुरू आहे. यासाठी अहेरी उपविभागातील सर्वच तालुकास्थानी असलेल्या वकील संघांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली येथे अहेरी उपविभागातील नागरिकांना पोहोचण्यासाठी पूर्ण दिवस घालवावा लागतो. मात्र, अहेरी येथे रस्तामार्गे पोहोचणे नागरिक आणि वकिलांना सोयीचे जाते.

अहेरी उपविभागातील अहेरी-एटापल्ली-सिरोंचा-मुलचेरा-भामरागड या तालुक्यातील नागरिकांना पैसा, वेळ वाचविण्यासाठी अहेरी हे ठिकाण केंद्रस्थानी ठरते. यामुळेच अहेरी आणि सिरोंचा येथील वकिलांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायालयाची मागणी केली आहे.

हेही वाचा -'त्या' व्हिडिओप्रकरणी अखेर ९ जणांवर गुन्हा दाखल

यासंबंधित निवेदन वर्षभरापूर्वीच राज्याच्या मुख्य न्यायाधीशांना पाठवण्यात आले होते. तर याचे स्मरण पत्र दहा दिवसांआधी पुन्हा एकदा देण्यात आले होते. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने अहेरी आणि सिरोंचा अधिवक्ता संघाच्या सदस्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

हे न्यायालय स्थापनेसाठी सर्व सुविधा अहेरीच्या विद्यमान न्यायालय इमारतीत उपलब्ध असताना केवळ प्रस्ताव प्रलंबित असल्याने ही मागणी पूर्णत्वास आलेली नाही. राज्य शासनाने तातडीने यावर कार्यवाही करण्याची मागणी अधिवक्ता संघाने केली आहे. तसेच ही मागणी पूर्ण न झाल्यास सर्व तालुकास्थानी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - 'अजित पवारांचा नेम अचूक, मात्र, चुकेल या भीतीनं मी नेम लावलाच नाही'

Intro:रेडी टू युज : अहेरीत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापनेसाठी वकीलांचे बेमुदत कामबंद आंदोलन

गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापनेसाठी वकील संघ आक्रमक झाले आहे. अहेरी-सिरोंचा येथील वकिलांनी 27 जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने न्यायालयीन कामकाजावर परिणाम दिसून येत आहे. या आंदोलनाला भाजपने समर्थन दिले आहे.Body:गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी हा स्वतंत्र पोलीस जिल्हा आहे. त्याच धर्तीवर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची मागणी सुरू आहे. यासाठी अहेरी उपविभागतील सर्वच तालुका स्थानी असलेल्या वकील संघांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली येथे अहेरी उपविभागातील नागरिकांना पोहोचण्यासाठी पूर्ण दिवस घालवावा लागतो. मात्र अहेरी येथे रस्तामार्गे पोहोचणे नागरिक व वकिलांना सोयीचे जाते. यामुळेच अहेरी व सिरोंचा येथील वकिलांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायालयाची मागणी पुढे रेटली आहे.

अहेरी उपविभागातील अहेरी-एटापल्ली-सिरोंचा-मुलचेरा-भामरागड या तालुक्यातील नागरिकांना पैसा- वेळ वाचविण्यासाठी अहेरी हे ठिकाण केंद्रस्थानी ठरते. यासंबंधीचे निवेदन वर्षभरापूर्वीच राज्याच्या मुख्य न्यायाधीशांना पाठवण्यात आले होते. तर याचे स्मरण पत्र दहा दिवसांआधी पुन्हा एकदा देण्यात आले होते. मात्र त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने अहेरी व सिरोंचा अधिवक्ता संघाच्या सदस्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे न्यायालय स्थापनेसाठी सर्व सुविधा अहेरीच्या विद्यमान न्यायालय इमारतीत उपलब्ध असताना केवळ प्रस्ताव प्रलंबित असल्याने ही मागणी पूर्णत्वास आलेली नाही. राज्य शासनाने तातडीने यावर कार्यवाही करण्याची मागणी अधिवक्ता संघाने केली असून ही मागणी पूर्ण न झाल्यास सर्व तालुकास्थानी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.Conclusion:बाईट 1) ऍड. एस. एम. कुंभारे, अहेरी
बाईट 2) ऍड. प्रीती दंबोडे, अहेरी
Last Updated : Feb 1, 2020, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.