गडचिरोली - महाराष्ट्रातील 18 प्रशिक्षणार्थी आय.ए.एस अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्यानिमित्त गडचिरोलीमधील दुर्गम आदिवासी भागाला भेट दिली. तिथे त्यांनी लोकांचे राहणीमान, व्यवसाय या गोष्टींची माहिती घेतली. तसेच त्यांनी लेकबिरादरी हेमलकसा प्रकल्पाला भेट देऊन आमटे दाम्पत्यांकडून आदिवासींचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी मनूज जिंदाल, तहसीलदार कैलास अंडिल, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवने, संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मगदूम आदी उपस्थित होते.
हेही वाचा - प्रभू श्रीरामाची कृपा..! मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा करणार अयोध्या वारी
आदिवासी संस्कृतीबद्दल जाणून घेण्याच्या उद्देशाने 18 प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमधील भामरागड येथे आपल मोर्चा वळवला. त्यांनी कोयनगुडा या आदिवासी गावात भेट दिल्यानंतर गावकरी व जिल्हा परिषद शाळेच्या विध्यार्थ्यांनी लेझीम नृत्याने स्वागत केले. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी तेथील संस्कृती, शेती, व्यवसाय, उत्पादन, दैनंदिन जीवन याबद्दल जाणून घेतले.