गडचिरोली - जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघाची लढत तीन आत्राम यांच्या उपस्थितीने लक्षवेधी झाली होती. या राजकीय संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी बाजी मारली आहे.
हेही वाचा- यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या नेत्यांची बंडखोरी सपशेल फेल
अखेरच्या फेरीपर्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत त्यांनी विद्यमान भाजप आमदार अंबरीश आत्राम यांचा 15 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. हे क्षेत्र गेली काही वर्षे विकासापासून वंचित राहिले होते. विकासाला गती देण्यासाठी आपण कार्यरत राहू, अशी प्रतिक्रिया त्यांनी विजयानंतर नोंदविली आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्या विजयानंतर अहेरी शहरातून प्रचंड मोठी विजयी मिरवणूक काढण्यात आली. रोजगार, रस्ते, शिक्षण, सिंचन या समस्यांकडे आपण लक्ष देऊ, असेही धर्मरावबाबा यांनी यावेळी सांगीतले.