गडचिरोली - केंद्रीय राखीव सुरक्षा बलमधील गट क्रमांक-10 चे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिंदे यांनी स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली आहे.
धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्रात संबंधित प्रकार उघडकीस आलाय. शिंदे सावरगाव येथे कार्यरत होते. आत्महत्येनंतर त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असून आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या पत्नीला देखील पत्र लिहिले.
संबंधित घटना लक्षात येताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.