ETV Bharat / state

गडचिरोलीतील शेतकऱ्यांवर पुन्हा निसर्गाची अवकृपा; वादळामुळे धानपीक भुईसपाट - गडचिरोली पाऊस बातमी

महापुरानंतर निरसर्गाने गडचिरोलीतील शेतकऱ्यांवर अवकृपा दाखवली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त धान पीक
नुकसानग्रस्त धान पीक
author img

By

Published : Oct 5, 2020, 8:31 PM IST

Updated : Oct 5, 2020, 9:25 PM IST

गडचिरोली - महापुरामुळे पीक नुकसानीचे घाव ताजे असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर निसर्गाने पुन्हा अवकृपा दाखवली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे धान पीक भुईसपाट झाले. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला असून चांगल्या उत्पन्नाची आशाही आता धुसर झाली आहे.

गडचिरोलीत वादळामुळे धानपीक भुईसपाट
1994 नंतर यावर्षी प्रथमच गडचिरोली जिल्ह्यात मोठा महापूर आला. मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने जिल्ह्यातील वैनगंगा कोपली. एक महिन्यापूर्वी वैनगंगा नदीच्या पुरामुळे जिल्ह्यातील तब्बल 24 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले. पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला असला तरी अद्यापही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या हाती पडलेली नाही. शेकडो शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

ज्या शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला नाही, त्या शेतकऱ्यांचे धान, कापूस पीक जोमात होते. मात्र, जिल्ह्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस सुरू असल्याने धान पीक पूर्णतः भुईसपाट झाले आहे.

अनेक शेतकऱ्यांचे धान पीक अंतिम टप्प्यात आहेत. पिकावर किडीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकरी हजारो रुपये खर्च करुन कीटकनाशकांची फवारणी करत आहेत. अशातच वादळामुळे धानाचे पीक खराब होऊन पत घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा धानाला भावही येणार नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. आधीच महापुराचा फटका, त्यातच आता वादळामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने मायबाप शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदतीचे वाटप करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा - विद्यापीठ कर्मचारी कामबंद आंदोलन : गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे 5 ऑक्टोबरपासूनच

Last Updated : Oct 5, 2020, 9:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.