गडचिरोली - आज (गुरुवारी) जिल्ह्यात 219 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तसेच 37 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आत्तापर्यंत 11 हजार 602 बाधितांपैकी 10 हजार 442 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 हजार 36 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 124 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज दोन नवीन मृत्यूमध्ये वनश्री कॉलनी गडचिरोली येथील 53 वर्षीय पुरुष व भामरागड येथील 73 वर्षीय महिला अशा दोघांचा समावेश आहे.
गडचिरोली तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.00 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 8.93 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के इतका आहे. बुधवारी आढळलेल्या नवीन 219 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सर्वाधिक 77, अहेरी तालुक्यातील 23, आरमोरी 11, भामरागड तालुक्यातील 30, चामोर्शी तालुक्यातील 6, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 13, कोरची तालुक्यातील 9, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये 12 तर वडसामधील 17 व इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 5 जणांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या 37 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 28, अहेरी 1, भामरागड 07, कुरखेडा 1 येथील जणाचा समावेश आहे.
मंगळवारी सायंकाळपर्यंत झालेले लसीकरण
जिल्ह्यातील शासकीय 67 व खाजगी 2 अशा मिळून 69 बुथवर पहिला लसीकरणाचा डोज 3 हजार 304 व दुसरा डोज 292 नागरिकांना देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 40 हजार 502 तर दुसरा डोज 10 हजार 455 नागरिकांना देण्यात आला आहे.