गडचिरोली- केंद्र सरकारने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची एस.पी.जी. सुरक्षा काढून घेतली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरात काँग्रेस पक्षातर्फे निषेध होत आहे. गडचिरोली शहरात देखील युवक काँग्रेस, जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने करुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर गांधी कुटुंबाला आजीवन एस.पी.जी. सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, अलीकडेच ती सुरक्षा काढण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात जोरदार नारेबाजी करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. मोदी सरकार सुडाचे राजकारण करत आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. यावेळी बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा- गडचिरोलीत जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षिकांचे निलंबन