चिमूर (गडचिरोली) - क्रांती शहिद स्मृती दिनानिमीत्त राज्याचे बहुजन कल्याण तथा पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी हुतात्मा स्मारक येथे शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
हुतात्मा स्मारकापुढेच भाजपा आमदार किर्तीकुमार भांगडिया यांचे कार्यालय आहे. हुतात्म्यांना आदरांजली वाहिल्यानंतर पालकमंत्री वडेट्टीवार यांचे मनोगत सुरू असताना भारतीय जनता पार्टीच्यावतीने काढण्यात आलेली बाईक रॅली हुतात्मा स्मारक येथे आली. ज्यामुळे काँग्रेस व भाजपा कार्यकर्ते तथा नेते आमने सामने आले.
यात कॉंग्रेस व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली असल्याची सर्वत्र चर्चा आहे. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलीस विभागाच्या माहितीनुसार याविषयी कुणाचीही तक्रार प्राप्त झालेली नाही.
हेही वाचा - धक्कादायक! नाशिकमधील प्रांताधिकाऱ्याची नियत घसरली, तलाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी
हेही वाचा -..तर तेथेच पवारांची आम्ही पोलखोल करणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा