ETV Bharat / state

जिल्ह्यातील विकास कामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री शिंदे यांचे निर्देश

जिल्हा वार्षिक योजनेतून विविध कामाची अंमलबजावणी करताना आलेल्या अडचणी व इतर विकास कामांमधील अडचणींवर उपसिथत लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी वन विभागाकडून आवश्यक असलेल्या मंजूरी वेळेत देण्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले.

बैठकीवेळचे छायाचित्र
बैठकीवेळचे छायाचित्र
author img

By

Published : Jan 31, 2021, 4:24 PM IST

Updated : Jan 31, 2021, 4:54 PM IST

गडचिरोली - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करण्याचे तसेच त्या निधीतून गुणवत्तापूर्ण काम करण्याचेे निर्देश दिले. येत्या 8 फेब्रुवारीला प्रारूप आराखड्याबाबत मुंबईत बैठक लावण्यात आली असून शासनाकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी जास्तीचा निधी मंजूर करून घेवू, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. मागील वर्षी 2019-20 मध्ये 99.68 टक्के म्हणजेच 480.83 कोटी झाला खर्च झाला. यावर सभेत चर्चा करण्यात आली.

बोलताना पालकमंत्री शिंदे

विविध समस्यांवर चर्चा

जिल्हा वार्षिक योजनेतून विविध कामाची अंमलबजावणी करताना आलेल्या अडचणी व इतर विकास कामांमधील अडचणींवर उपसिथत लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी वन विभागाकडून आवश्यक असलेल्या मंजूरी वेळेत देण्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले. आदिवसी व दुर्गम भागातील विकास प्रक्रियेत वन विभागाकडून अडचणी निर्माण होता कामा नये तसेच जिल्ह्याचा विकास करून नक्षलवाद कमी करायचा आहे. यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने द्याव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील धान खरेदीबाबत असलेल्या अडचणीवरही चर्चा झाली. वन पट्टेधारक शेतकऱ्यांच्या धान खरेदीमधील अडचणी राज्य स्तरावरून सोडविण्यात आले आहेत. त्यांचे धान खरेदी ऑनलाइन होत असल्यामूळे त्यामध्ये काही अडचणी होत्या. त्या आता दूर झाल्या आहेत, असे मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सांगितले.

विविध विकास कामांचे लोकर्पण

गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरीतील प्रशासकीय इमारत व बाल रुग्णालय, कुरखेडा येथील उपविभागीय व तहसील कार्यालय, मायक्रो एटीएम इत्यादी कामांचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने पार पडले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या कामांची प्रशंसा पालकमंत्र्यांनी केली. आरमोरी व कुरखेडामधील सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आतिदक्षता विभागाचेही लोकार्पण यावेळी झाले. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात अतिशय आवश्यक व चांगली व्यवस्था उभी करण्यात आली आहे, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्ह्यात मोठ्या शहरातील खासगी रुग्णालयासारखी व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालय या शासकीय दवाखान्यात करण्यात आली आहे ही विशेष बाब आहे. नव्याने सुरू झालेल्या आरटीपीसीआर या आत्याधुनिक प्रयोगशाळेचेही उद्घाटन त्यांचे हस्ते करण्यात आले.

हेही वाचा - नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या अहेरीतून 'राष्ट्रवादी परिवार संवाद'यात्रेची सुरुवात

Last Updated : Jan 31, 2021, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.