गडचिरोली - राज्यात, तसेच जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्य सरकारने वीकेंड लाकडाऊन घोषित केला आहे. आज गडचिरोली शहरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णत: बंद आहेत. एरवी गजबजलेले रस्ते आज शांत दिसले. नागरिकांनीही उत्स्फुर्तपणे लॉकडाऊनला प्रतिसाद दर्शवला.
हेही वाचा - गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह 229 नवीन कोरोनाबाधितांची नोंद
नागरिकांनी खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून दोनशेहून अधिक कोरोनाबाधित आढळत असून आज तब्बल 267 कोरोनाबाधित आढळून आले. राज्यात हीच स्थिती असल्याने राज्य सरकारने कठोर निर्बंध लावले आहेत. त्याचा परिणाम म्हणून वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून गडचिरोली शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठाने तीन दिवसांपासून पूर्ण बंद आहेत. शाळा महाविद्यालये यापूर्वीच बंद करण्यात आले असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत झालेले लसीकरण
जिल्ह्यातील शासकीय 68 व खासगी 2 असे मिळून 70 बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोस 1 हजार 125 व दुसरा डोस 214 नागरिकांना देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 44 हजार 982, तर दुसरा डोस 10 हजार 918 नागरिकांना देण्यात आला आहे.
हेही वाचा - अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद