ETV Bharat / state

गडचिरोलीत १०१ टक्के मीच जिंकणार, भाजपच्या अशोक नेतेंचा विश्वास

'भूमिपूजन स्पेशलिस्ट सरकार' या काँग्रेसच्या आरोपाचे खंडन करताना अशोक नेते म्हणाले, आम्ही मंजूर कामाचेच भूमिपूजन व लोकार्पण करतो. काँग्रेस सरकारनेच एका कामाचे दहावेळा भूमिपूजन केले. उलट ते आमच्यावर आरोप करीत आहेत, असे ते म्हणाले.

अशोक नेते यांच्याशी ईटीव्ही भारतचा संवाद
author img

By

Published : Mar 31, 2019, 6:39 PM IST

गडचिरोली - आगामी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे. त्यामुळे १०१ टक्के मीच निवडणूक जिंकणार, असा विश्वास गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार अशोक येथे नेते यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात 15 हजार कोटींचे काम केल्याचा दावाही त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला.

अशोक नेते यांच्याशी ईटीव्ही भारतचा संवाद

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने अतिशय चांगले काम करून कल्याणकारी योजना राबवल्याचे अशोक नेते यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. एक रुपया मंजूर केला तर लाभार्थ्यापर्यंत केवळ १५ पैसे पोहोचतात, असे राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना वक्तव्य केले होते. मात्र भाजप सरकारच्या काळात केंद्रात जेवढे पैसे मंजूर झाले, तेवढे पैसे थेट लाभार्थ्यांना मिळाले, असा दावा नेते यांनी केला.

काँग्रेस सरकारनेच केले एका कामाचे दहावेळा भूमिपूजन - नेते

'भूमिपूजन स्पेशलिस्ट सरकार' या काँग्रेसच्या आरोपाचे खंडन करताना अशोक नेते म्हणाले, आम्ही मंजूर कामाचेच भूमिपूजन व लोकार्पण करतो. काँग्रेस सरकारनेच एका कामाचे दहावेळा भूमिपूजन केले. उलट ते आमच्यावर आरोप करीत आहेत, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील जनतेने २०१४ मध्ये मला लोकसभेसाठी संधी दिली. त्या संधीचे आपण आजपर्यंत प्रामाणिकपणे सोने केले.

आचारसंहिता संपताच ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात परिपत्रक निघणार-

जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत करणे, सिंचन, आरोग्य या समस्यांना आपण प्राथमिकता देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसीच्या घटलेल्या आरक्षण काँग्रेस सरकार जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला. आचारसंहिता संपताच ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात परिपत्रक निघणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

२०१४ पेक्षा अनुकूल स्थिती असल्याचा दावा-

आमच्या पक्षांमध्ये कुठलीही गटबाजी नसून सर्व आमदार व कार्यकर्ते एक दिलाने काम करीत आहेत. २०१४ पेक्षा यावेळी स्थिती अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. गेल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्याने निवडून आलो. याही निवडणुकीत मताधिक्य कायम राहील. गतनिवडणुकीत तब्बल २४ हजार मतदारांनी 'नोटा'ला पसंती दिली होती. मात्र यावेळेस मतदार जागृत झाले आहेत. त्यामुळे मी २०१४ पेक्षाही जास्त मताने १०१ टक्के निवडून येईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

Intro:Body:

गडचिरोलीत १०१ टक्के मीच जिंकणार, भाजपच्या अशोक नेतेंचा विश्वास

गडचिरोली - आगामी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे. त्यामुळे १०१ टक्के मीच निवडणूक जिंकणार, असा विश्वास गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार अशोक येथे नेते यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात 15 हजार कोटींचे काम केल्याचा दावाही त्यांनी  ईटीव्ही भारतशी बोलताना केला.

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने अतिशय चांगले काम करून कल्याणकारी योजना राबवल्याचे अशोक नेते यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. एक रुपया मंजूर केला तर लाभार्थ्यापर्यंत केवळ 15 पैसे पोहोचतात, असे राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना वक्तव्य केले होते. मात्र भाजप सरकारच्या काळात केंद्रात जेवढे पैसे मंजूर झाले, तेवढे पैसे थेट लाभार्थ्यांना मिळाले, असा दावा  नेते यांनी केला.

 काँग्रेस सरकारनेच एका कामाचे दहावेळा भूमिपूजन - नेते

'भूमिपूजन स्पेशलिस्ट सरकार' या काँग्रेसच्या आरोपाचे खंडन करताना अशोक नेते म्हणाले, आम्ही मंजूर कामाचेच भूमिपूजन व लोकार्पण करतो. काँग्रेस सरकारनेच एका कामाचे दहावेळा भूमिपूजन केले. उलट ते आमच्यावर आरोप करीत आहेत, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील जनतेने 2014 मध्ये मला लोकसभेसाठी संधी दिली. त्या संधीचे आपण आजपर्यंत प्रामाणिकपणे सोने केले.  

आचारसंहिता संपताच ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात परिपत्रक निघणार

जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत करणे, सिंचन, आरोग्य या समस्यांना आपण प्राथमिकता देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसीच्या घटलेल्या आरक्षण काँग्रेस सरकार जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला.  आचारसंहिता संपताच ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात परिपत्रक निघणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

२०१४ पेक्षा अनुकूल स्थिती असल्याचा दावा

आमच्या पक्षांमध्ये कुठलीही गटबाजी नसून सर्व आमदार व कार्यकर्ते एक दिलाने काम करीत आहेत. 2014 पेक्षा यावेळी स्थिती अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. गेल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्याने निवडून आलो. याही निवडणुकीत मताधिक्य कायम राहील. गतनिवडणुकीत तब्बल 24 हजार मतदारांनी 'नोटा'ला पसंती दिली होती. मात्र यावेळेस मतदार जागृत झाले आहेत. त्यामुळे मी 2014 पेक्षाही जास्त मताने 101 टक्के निवडून येईल, असा त्यांनी विश्वास  व्यक्त केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.