ETV Bharat / state

भामरागडच्या आदिवासींनी पहिल्यांदाच अनुभवली आधुनिक भारताची झलक

आदिवासी दुर्गम भागात राहत असल्याने त्यांची शहरांशी नाळ तुटली आहे. मात्र, लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना आधुनिक भारताचे दर्शन घडवले गेले आहे. यावेळी भामरागडच्या ३५ आदिवासींनी प्रथमच नागपूरच्या 'मेट्रोची राईड' करून आधुनिक भारताची झलक बघितली आहे.

आदिवासींनी पहिल्यांदाच अनुभवली आधुनिक भारताची झलक
author img

By

Published : Nov 9, 2019, 7:49 PM IST

गडचिरोली - एकीकडे भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे अनेक गावांनी आजही साधी बस बघितलेली नाही. एकीकडे शहरामध्ये टोलेजंग इमारती उभ्या आहेत तर भामरागडसारख्या गावांमध्ये अनेकांना राहण्यासाठी पक्का निवारा नाही. त्याचबरोबर, गावात जाण्यासाठी धड रस्ता देखील नाही. आदिवासी दुर्गम भागात राहत असल्याने त्यांची शहरांशी नाळ तुटली आहे. मात्र, लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना आधुनिक भारताचे दर्शन घडवले गेले आहे. यावेळी ३५ आदिवासींनी प्रथमच नागपूरच्या 'मेट्रोची राईड' करून आधुनिक भारताची झलक बघितली आहे.

आदिवासींनी पहिल्यांदाच अनुभवली आधुनिक भारताची झलक

लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाच्या वतीने दरवर्षी भामरागड तालुक्यातल्या लहान-लहान खेड्यापाड्यातील आदिवासी स्त्री-पुरुषांना तसेच मुलांना बाहेरचे जग दाखविण्याचा उपक्रम आयोजित केला जातो. यावेळेस भामरागड तालुक्यातील कोडपे व तिरकामेटा या दोन अतिदुर्गम गावातील ३५ आदिवासी स्त्री-पुरुषांना नागपूरची सहल घडवण्यात आली. तीन दिवसांच्या या दौऱ्यात त्यानी सर्वप्रथम सोमनाथला भेट दिली. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन बघितले आणि गुरुवारी नागपुरात दाखल झाले. यावेळी नागपूरच्या मेट्रोची राईड करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखे होते.

गावामध्ये साधी बसगाडीही न बघितलेले आदिवासी आज चक्क मेट्रोने प्रवास करीत असल्याने ते भारावून गेले होते. यावेळी या आदिवासींनी मध्यवर्ती संग्रहालय, झिरो माइल, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, नारायण स्वामी मंदिर असे नागपूर दर्शन करून दिक्षाभूमीला भेट दिली. या ३५ जणांमध्ये सात ते आठ वर्षाच्या शाळेतील मुलांसोबतच वयाची ६० वर्षे पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा व चार स्त्रियांचा सहभाग होता. नागपूर दर्शन करताना दूरदूरपर्यंत दिसणार्‍या उंच इमारती, मधल्या भागात असलेली वनराई, असे अनेक नवलाईचे दृश्य ते डोळ्यांनी निरखत होते. विमानतळ परिसरातून जाताना एकदम जवळून उडणारे विमान पाहताना त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.

हेही वाचा- अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांचे 'रोड मार्च'

Intro:भामरागडच्या आदिवासींनी पहिल्यांदाच अनुभवली आधुनिक भारताची झलक

गडचिरोली : एकीकडे भारत महासत्तेकडे वाटचाल करीत आहे तर दुसरीकडे अनेक गावांनी आजही साधी बस बघितलेली नाही. एकीकडे शहरामध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत तर भामरागडसारख्या गावांमध्ये अनेकांना राहण्यासाठी पक्का निवारा नाही. गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही. त्यामुळे भामरागड तालुक्यातील आदिवासी जगाच्या संपर्कहीन आहेत. मात्र लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना आधुनिक भारताचे दर्शन घडले. यावेळी 35 आदिवासींनी प्रथमच नागपूरच्या 'मेट्रोची राईड' करून आधुनिक भारताची झलक बघितली.Body:लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाच्या वतीने दरवर्षी भामरागड तालुक्यातल्या लहान-लहान खेड्यापाड्यातील आदिवासी स्त्री-पुरुषांना तसेच मुलांना बाहेरचे जग दाखवण्याचा उपक्रम आयोजित केला जातो. यावेळेस भामरागड तालुक्यातील कोडपे व तिरकामेटा या दोन अतिदुर्गम गावातील 35 आदिवासी स्त्री-पुरुषांना नागपूरची सहल घडवण्यात आली. तीन दिवसांच्या या दौऱ्यात त्यानी सर्वप्रथम सोमनाथला भेट दिली. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन बघितले आणि गुरुवारी नागपुरात दाखल झाले. यावेळी नागपूरच्या मेट्रोची राईड करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखे होते.

गावामध्ये साधी बसगाडीही न बघितलेले आदिवासी आज चक्क मेट्रोने प्रवास करीत असल्याने ते भारावून गेले होते. यावेळी या आदिवासींनी मध्यवर्ती संग्रहालय, झिरो माइल, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, नारायण स्वामी मंदिर असे नागपूर दर्शन करून दीक्षाभूमीला पोहोचले. या 35 जणांमध्ये सात ते आठ वर्षाच्या शाळेतील मुलांसोबतच वयाची 60 वर्षे पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा व चार स्त्रियांचा सहभाग होता. नागपूर दर्शन करताना दूरदूरपर्यंत दिसणार्‍या उंच इमारती, मधल्या भागात असलेली वनराई असे अनेक नवलाईचे दृश्य ते डोळ्यांनी निरखत होते. विमानतळ परिसरातून जाताना एकदम जवळून उडणारे विमान पाहताना त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
Conclusion:सोबत व्हिज्युअल व बाईट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.