ETV Bharat / state

आढावा मतदारसंघाचा : अतिसंवेदनशील 'अहेरी मतदारसंघात' तिरंगी लढतीची शक्यता

धर्मराव बाबा आत्रामआघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीही होते. मात्र, बारामती भागात काळवीट शिकार प्रकरणात त्यांना मंत्रीपद गमवावं लागलं होत. 2009 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दीपक आत्राम यांनी त्यांना पराभूत केलं. तर, 2014 मध्ये भाजपचे राजे अंबरीशराव यांनी त्यांना 19,858 मतांनी पराभूत केले होते. मात्र, यावेळी चित्र वेगळे असून त्यांनाही विजयाची आशा आहे.

गडचिरोली
author img

By

Published : Sep 17, 2019, 5:00 PM IST

गडचिरोली - अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेला अहेरी मतदारसंघ एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. धर्मराव बाबा आत्राम हे अहेरीचे सर्वेसर्वा होते. मात्र, मोदी लाटेत त्यांचा हा बालेकिल्ला भाजपने बळकावला आणि ज्या अहेरीत एकेकाळी भाजपचे बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते होते, तिथे आता अनेकांना भाजप प्रवेशाचे वेध लागले आहे. फक्त वेधच नाही तर झुंबड उडाली आहे.

गडचिरोलीआमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी घेतलेला आढावा...

अतिसंवेदशील असलेल्या या मतदारसंघात यापूर्वी तिरंगी लढती झाल्या. यावेळीही तश्याच लढतीची शक्यता असली तरी भाजपला भाव आहे. कारण, अनेक प्रस्तापित नेत्यांना भाजपमध्ये जायचे आहे.

नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील आणि आदिवासी'... होय अशीच ओळख आहे या मतदारसंघाची. नक्षलग्रस्त आणि राज्याच्या अगदी टोकावर असलेला गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्यामुळे साहजिकच 'अतिसंवेदनशील' हे बिरूद या मतदारसंघातील जवळपास प्रत्येक मतदान केंद्राला चिटकलेलं आहे. अहेरी मतदारसंघात अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि मूलचेरा या तब्बल पाच तालुक्यांचा समावेश होतो. पाचही तालुके अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातली निवडणूक कधीच सामान्य नसते. प्रशासन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या लेखी तर महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक विधानसभा मतदारसंघात अहेरीचे नाव घेतात.

भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम हे गोंड राजघराण्याचे सहावे वंशज. राजे सत्यवानराव आत्राम यांचे ते चिरंजीव. कट्टर विदर्भवादी नेते असलेले सत्यवान आत्राम यांनी नागविदर्भ आंदोलन समितीची स्थापना केली. 90 च्या दशकात अपक्ष म्हणून नागविदर्भ आंदोलन समितीच्या बॅनरखाली त्यांनी विधानसभा लढवली. ते सलग दोनवेळा आमदार राहिले. मात्र, ते फार काळ राजकारणात राहू शकले नाही.

राजे सत्यवान यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाल्याने त्यांचा राजकीय वारसा विद्यमान आमदार राजे अंबरीषराव आत्राम यांना मिळाला. 2014 मध्ये अंबरीष आत्राम हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि त्यांना भाजपतर्फे ऑफर देण्यात आली. त्यांनी ती स्वीकारली आणि मोदी लाटेत ते प्रचंड मतांनी निवडून आले. राज्याच्या विधानसभेत युवा चेहरा, उच्च शिक्षित असल्याने त्यांना भाजपने राज्यमंत्रीपद दिले. त्यांच्याकडे आदिवासी विकास आणि वन मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला. तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीही बनवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, नव्यानेच राजकारणात आलेल्या अंबरिषरावांचा राजकीय अनुभव कमी पडला. अनेक महत्त्वाच्या बैठकीत ते गैरहजर राहिले, संपर्कही कमी झाला. स्थानिक संघ परिवारातील लोकांनाही ते वेळ देत नाही, अशा अनेक तक्रारीमुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्याचे मंत्रिपद काढून घेण्यात आले. आता परत त्यांना भाजप तिकीट देईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

दुसरीकडे धर्मरावबाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते 1971-72 पासून राजकारणात सक्रिय असून नागविदर्भ आंदोलन समितीचे खंदे कार्यकर्ते असलेले धर्मराव बाबा आत्राम 1990 ते 95 या काळात काँग्रेसचे आमदार राहिले. 1995 ते 99 या काळात ते गोंडवाना गणतंत्र पक्षाचे आमदार होते. 2004 मध्ये ते राष्ट्रवादीत आले.

आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते. मात्र, बारामती भागात काळवीट शिकार प्रकरणात त्यांना मंत्रीपद गमवावं लागलं होत. 2009 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दीपक आत्राम यांनी त्यांना पराभूत केलं. तर, 2014 मध्ये भाजपचे राजे अंबरीशराव यांनी त्यांना 19,858 मतांनी पराभूत केले होते. मात्र, यावेळी चित्र वेगळे असून त्यांनाही विजयाची आशा आहे.

आदिवासी विद्यार्थी सेनेचे सर्वेसर्वा असलेले दीपक आत्राम यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. 2009 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढली आणि राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम यांना पराभूत करत पदार्पणातच निवडणूक जिंकली. मात्र, पाच वर्षात मतदारसंघातील मुलभूत प्रश्न सोडवण्यास ते असमर्थ ठरले. शून्यातून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या दीपक आत्राम यांना 2014 च्या निवडणुकीत अहेरीच्या मतदारांनी घरी बसवलं. यावेळीही ते आपलं नशीब आजमवणार आहेत.

सध्या अहेरी विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र दिसत असले तरी भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे अनेक उमेदवार भाजपच्या मेगाभरतीत जाण्यास इच्छुक आहेत. धर्मराव बाबा आत्राम हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. तर, दीपक आत्रामही मुंबईच्या चकरा मारत असल्याची चर्चा आहे. राजे अंबरीषराव यांचं मंत्रिपद काढल्याने ते नाराज आहेतच. भाजपची महाजनादेश यात्रा गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली तेव्हा देसाईगंज, गडचिरोली शहरात जाहीर सभा झाल्या. मात्र राजेंनी सभांकडे पाठ फिरवली. त्यामुळे तिकीट देताना पक्ष त्यांच्याकडे पाठ तर फिरवणार नाही ना, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न

1) दुर्गम भागात जाण्यासाठी आजही रस्ते नाहीत.
2) अनेक नदी-नाल्यांवर पूल नाही. त्यामुळे पावसाळ्यात शेकडो गावांचा संपर्क तुटतो.
3) शंभरपेक्षा जास्त गावात अजून वीज पोहचली नाही.
4) दुर्गम भागात आरोग्याची समस्या पाचवीला पुजलेलीच.
5) शिक्षणाच्याही सुविधा नाहीत.
6) विविध विभागाचे शेकडो पदे रिक्त आहेत.
7) सुरजागड भागात मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती असूनही सुद्धा एकही मोठा कारखाना नाही. त्यामुळे अनेक युवक बेरोजगार आहेत.

अशा शेकडो समस्या या मतदारसंघात वर्षोनुवर्षे कायम आहेत.

अहेरीचा 2014 चा निकाल

१) राजे अंबरीशराव आत्राम - भाजप- 56,418
२) धर्मरावबाब आत्राम - राष्ट्रवादी काँग्रेस- 36,560
३) दीपक आत्राम - अपक्ष- 33,555
भाजपचे राजे अंबरीशराव 19,858 मताने विजयी

Intro:आढावा मतदारसंघाचा

अतिसंवेदशील अहेरी मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता; तरीही भाजपला भाव

गडचिरोली : अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेला अहेरी मतदारसंघ एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. धर्मराव बाबा आत्राम हे अहेरीचे सर्वेसर्वा होते. मात्र मोदी लाटेत त्यांचा हा बालेकिल्ला भाजपने बळकावला आणि ज्या अहेरीत एकेकाळी भाजपचे बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते होते, तिथे आता अनेकांना भाजप प्रवेशाचे वेध लागले आहे. फक्त वेधच नाही तर झुंबड उडाली आहे. अतिसंवेदशील असलेल्या या मतदारसंघात यापूर्वी तिरंगी लढती झाल्या. यावेळीही तश्याच लढतीची शक्यता असली भाजपला भाव आहे... कारण अनेक प्रस्तापित नेत्यांना भाजपमध्ये जायचं आहे.Body:'नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील आणि आदिवासी'... होय अशीच ओळख आहे या मतदारसंघाची. नक्षलग्रस्त आणि राज्याच्या अगदी टोकावर असलेला गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्यामुळे साहजिकच 'अतिसंवेदशील' हे बिरूद या मतदारसंघातील जवळपास प्रत्येक मतदान केंद्राला चिटकलेलं आहे. अहेरी मतदारसंघात अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि मूलचेरा या तब्बल पाच तालुक्यांचा समावेश होतो. पाचही तालुके अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातली निवडणूक कधीच सामान्य नसते. प्रशासन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या लेखी तर महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक विधानसभा मतदारसंघात अहेरीचं नाव घेतात.

भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री
राजे अंबरीशराव आत्राम हे गोंड राजघराण्याचे सहावे वंशज. राजे सत्यवानराव आत्राम यांचे ते चिरंजीव. कट्टर विदर्भवादी नेते असलेले सत्यवान आत्राम यांनी नागविदर्भ आंदोलन समितीची स्थापना केली. 90 च्या दशकात अपक्ष म्हणून नागविदर्भ आंदोलन समितीच्या बॅनरखाली त्यांनी विधानसभा लढवली. ते सलग दोन वेळा आमदार राहिले. मात्र फार काळ राजकारणात राहू शकले नाही.
राजे सत्यवान यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाल्याने त्यांचा राजकीय वारसा विद्यमान आमदार राजे अंबरीषराव आत्राम यांना मिळाला. 2014 मध्ये अंबरीष आत्राम हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि त्यांना भाजपतर्फे ऑफर देण्यात आली. त्यांनी ती स्वीकारली आणि मोदी लाटेत ते प्रचंड मताने निवडून आले. राज्याच्या विधानसभेत युवा चेहरा, उच्च शिक्षित असल्याने त्यांना भाजपने राज्यमंत्रीपद दिलं. त्यांच्याकडे आदिवासी विकास आणि वन मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला. तसेच गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीही बनवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र नव्यानेच राजकारणात आलेल्या अंबरिषरावांचा राजकीय अनुभव कमी पडला. अनेक महत्त्वाच्या बैठकीत ते गैरहजर राहिले, संपर्कही कमी झाला. स्थानिक संघ परिवारातील लोकांनाही ते वेळ देत नाही, अशा अनेक तक्रारीमुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्याचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं. आता परत त्यांना भाजप तिकीट देईल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

तर दुसरीकडे धर्मरावबाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते 1971-72 पासून राजकारणात सक्रिय असून नागविदर्भ आंदोलन समितीचे खंदे कार्यकर्ते असलेले धर्मराव बाबा आत्राम 1990 ते 95 या काळात काँग्रेसचे आमदार राहिले. 1995 ते 99 या काळात ते गोंडवाना गणतंत्र पक्षाचे आमदार होते. 2004 मध्ये ते राष्ट्रवादीत आले.
आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते. मात्र बारामती भागात काळवीट शिकार प्रकरणात त्यांना मंत्रीपद गमवावं लागलं होत. 2009 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दीपक आत्राम यांनी त्यांना पराभूत केलं. तर 2014 मध्ये भाजपचे राजे अंबरीशराव यांनी त्यांना 19,858 मताने पराभूत केले होते. मात्र यावेळी चित्र वेगळे असून त्यांनाही विजयाची आशा आहे.

आदिवासी विद्यार्थी सेनेचे सर्वेसर्वा असलेले दीपक आत्राम यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. 2009 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढली आणि राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम यांना पराभूत करत पदार्पणातच निवडणूक जिंकली. मात्र पाच वर्षात मतदारसंघातील मुलभूत प्रश्न सोडवण्यास ते असमर्थ ठरले. शून्यातून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या दीपक आत्राम यांना पुढील म्हणजे 2014 च्या निवडणुकीत अहेरीच्या मतदारांनी घरी बसवलं. यावेळीही ते आपलं नशीब आजमवणार आहेत.

सध्या अहेरी विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र दिसत असले तरी भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे अनेक उमेदवार भाजपच्या मेगाभरतीत जाण्यास इच्छुक आहेत. धर्मराव बाबा आत्राम हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. तर दीपक आत्रामही मुबंईच्या चकरा मारत असल्याची चर्चा आहे. राजे अंबरीषराव यांचं मंत्रिपद काढल्याने ते नाराज आहेतच. भाजपची महाजनादेश यात्रा गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली तेव्हा देसाईगंज, गडचिरोली शहरात जाहीर सभा झाल्या. मात्र राजेंनी सभांकडे पाठ फिरवली. त्यामुळे तिकीट देताना पक्ष त्यांच्याकडे पाठ तर फिरवणार नाही ना, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
1) दुर्गम भागात जाण्यासाठी आजही धड रस्ते नाहीत.
2) अनेक नदी-नाल्यांवर पूल नाही. त्यामुळे पावसाळ्यात शेकडो गावांचा संपर्क तुटतो.
3) शंभरपेक्षा जास्त गावात अजून वीज पोहचली नाही.
4) दुर्गम भागात आरोग्याची समस्या पाचवीला पुजलेलीच. 5) शिक्षणाच्याही सुविधा नाहीत.
6) विविध विभागाचे शेकडो पदे रिक्त आहेत.
7) सुरजागड भागात मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती असूनही सुद्धा एकही मोठा कारखाना नाही. त्यामुळे अनेक युवक बेरोजगार आहेत. अशा शेकडो समस्या या मतदारसंघात वर्षोनुवर्षे कायम आहेत.

अहेरीचा 2014 चा निकाल
१) राजे अंबरीशराव आत्राम - भाजप- 56,418
२) धर्मरावबाब आत्राम - राष्ट्रवादी काँग्रेस- 36,560
३) दीपक आत्राम - अपक्ष- 33,555
भाजपचे राजे अंबरीशराव 19,858 मताने विजयी

Conclusion:सोबत pkg आहे. पूर्ण लावावे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.