ETV Bharat / state

सरपणासाठी जंगलात गेलेल्या वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

गडचिरोलीतील धुंडेशिवनीत ही घटना घडली आहे. पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यात या इसमाचा मृत्यू झाला आहे.

सरपणासाठी जंगलात गेलेल्या वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
सरपणासाठी जंगलात गेलेल्या वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
author img

By

Published : Jan 31, 2021, 5:33 PM IST

गडचिरोली : सरपण आणण्यासाठी जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला केल्याची घटना गडचिरोलीतील धुंडेशिवनीत घडली आहे. यात या इसमाचा मृत्यू झाला. दयाराम धर्माजी चुधरी (वय 67 वर्ष) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास घडली.

सोबतच्या दोघांसमोर घडला थरार
दयाराम चुधरी सकाळी आपल्या दोन सहकाऱ्यांसह धुंडेशिवनीपासून 3 ते 4 किलोमीटर दूरपर्यंत जंगलात सरपण आणण्यासाठी गेले होते. सरपण गोळा करीत असताना अचानक पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांना 70 ते 80 मीटरपर्यंत ओढत नेले. वाघाच्या हल्ल्याचा हा थरार दयाराम यांच्या दोन्ही सहकाऱ्यांनी बघितला. यावेळी दोघांनी केलेल्या आरडाओरडीमुळे वाघ तिथून पळून गेला. मात्र तोपर्यंत दयाराम यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती लगेच वनविभागाला देण्यात आली.
वनविभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

वनविभागाने या भागात वाघाचा वावर वाढल्याचे सांगत नागरिकांनी जंगलात जाऊ नये, असे आवाहन आधीच केले होते. मात्र या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.
वारसांना 15 लाखांची मदत
पोर्लाचे वनपरिक्षेत्राधिकारी चांगले यांनी ताबडतोब घटनास्थळाकडे धाव घेतली. मृताच्या वारसांना शासकीय नियमानुसार 5 लाख रूपये रोख आणि 10 लाख रुपये ठेवस्वरूपात दिले जातील. ताबडतोब सानुग्रह मदत म्हणून पोर्ला वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून 10 हजार रूपयांची राशी दिली जाणार आहे. गडचिरोली तालुक्यात वाघाचा वावर वाढला असल्यामुळे नागरिकांनी सुदूर जंगलात कोणत्याही कामासाठी जाऊ नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, असेही वनविभागाने म्हटले आहे.

हेही वाचा - भोकरदन तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.