ETV Bharat / state

वनविभागाचा बेजबाबदारपणा; अखेर कमलापूर हत्ती कॅम्पमधील 'आदित्य'चा मृत्यू - कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये हत्तीचा मृत्यू

आदित्य हा हत्तीकॅम्प परिसरातील तलावाच्या चिखलात अडकला होता. त्याला बाहेर काढण्यात आल्यानंतर तेव्हापासून तो अशक्त झाल्याने वनविभागाने त्याच्यावर उपचार सुरू केले होते. हत्तीवर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण न करता स्थानिक डॉक्टरांकडूनच उपचार सुरू होते. अखेर आज त्याचा मृत्यू झाला आहे.

gadchiroli
आदित्य हत्ती
author img

By

Published : Jun 29, 2020, 3:00 PM IST

Updated : Jun 30, 2020, 4:34 PM IST

गडचिरोली - सिरोंचा वनविभागांतर्गत असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील चार वर्षाच्या आदित्य हत्तीचा अखेर सोमवारी मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासाठी न बोलविता गेल्या दहा दिवसांपासून स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार केल्याने वनविभागाचा बेजबाबदारपणा हत्तीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याची टीका वन्यजीव प्रेमींकडून होत आहे.

वनविभागाचा बेजबाबदारपणा; अखेर कमलापूर हत्ती कॅम्पमधील 'आदित्य'चा मृत्यू

आदित्य हा 11 जूनला हत्तीकॅम्प परिसरातील तलावाच्या चिखलात अडकला होता. त्याला बाहेर काढण्यात आल्यानंतर तेव्हापासून तो अशक्त झाल्याने वनविभागाने त्याच्यावर उपचार सुरू केले होते. कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये एकूण 10 हत्ती होते. मात्र, या हत्तीची देखरेख करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नाही. हत्तीवर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण न करता स्थानिक डॉक्टरांकडूनच उपचार सुरू होते.

सोमवारी सकाळी केवळ चार वर्षाच्या आदित्य हत्तीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी वन्यजीव प्रेमी महेश गुंडेट्टीवार यांनी केली आहे. आतातरी वनविभाग येथील माहुतांची रिक्तपदे भरणार का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Last Updated : Jun 30, 2020, 4:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.