ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे अदानी, अंबानीच्या घशात ; नाना पटोलेंचा घणाघात - nana patole

काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले
author img

By

Published : Aug 29, 2019, 1:32 PM IST

Updated : Aug 29, 2019, 2:56 PM IST

13:02 August 29

शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे अदानी, अंबानीच्या घशात ; नाना पटोले यांचा घणाघात

महापर्दापाश सभेत बोलताना नाना पटोले

गडचिरोली - 'प्रधानमंत्री पिक विमा' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे पैसे अदानी, अंबानी यांच्या घशात जात आहेत. भाजप सरकारची योजना शेतकऱ्यांविरोधी असून गोरगरीब आदिवासी जनतेच्या पैशाची उधळपट्टी भाजप सरकारकडून केली जात असल्याची घणाघाती टीका काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांनी केली.

गडचिरोली येथे गुरुवारी महापर्दापाश सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले मुख्यमंत्री जनतेला भूलथापा देत आहेत. भाजप सरकारमुळे पोलीसही हतबल झाले असून ते पेशव्यांप्रमाणे वागत आहेत. त्यामुळेच चंद्रपुरातील बळीराज धोटे यांना पहाटेच्या सुमारास अटक झाली. जनसामान्यांना न्याय मागण्याचा हक्क राहिलेला नाही. त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही. गणपती विसर्जनानंतर भाजप सरकारचेही विसर्जन होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की भाजप सरकारने गडचिरोली जिल्हावासीयांची दिशाभूल केली आहे. ओबीसींना आरक्षणाचे गाजर दाखवून पुन्हा भूलथापा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आघाडीचे सरकार आल्यास गडचिरोलीच्या विकासाची जबाबदारी आपण घेणार असून सुरजागड लोह प्रकल्प गडचिरोलीतच झाला पाहिजे, यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष नामदेव उसेंडी यांची उपस्थिती होती.
 
Intro:शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे अदानी, अंबानीच्या घशात ; नाना पटोले यांचा घणाघात

गडचिरोली : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे पैसे अदानी, अंबानी यांच्या घशात जात आहेत. भाजप सरकारची योजना शेतकऱ्यांविरोधी असून गोरगरीब आदिवासी जनतेच्या पैशाची उधळपट्टी भाजप सरकारकडून केली जात असल्याची घणाघाती टीका काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांनी केले. Body:गडचिरोली येथे गुरुवारी महापर्दापाश सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले मुख्यमंत्री जनतेला भूलथापा देत आहेत. भाजप सरकारमुळे पोलीसही हतबल झाले असून ते पेशव्यांप्रमाणे वागत आहेत. त्यामुळेच चंद्रपुरातील बळीराज धोटे यांना पहाटेच्या सुमारास अटक झाली. जनसामान्यांना न्याय मागण्याचा हक्क राहिलेल्या नाही. त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही. गणपती विसर्जनानंतर भाजप सरकारचाही विसर्जन होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, भाजप सरकारने गडचिरोली जिल्हावासीयांची दिशाभूल केली आहे. ओबीसींना आरक्षणाचे गाजर दाखवून पुन्हा भूलथापा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आघाडीचे सरकार आल्यास गडचिरोलीच्या विकासाची जबाबदारी आपण घेणार असून सुरजागड लोह प्रकल्प गडचिरोलीतच झाला पाहिजे, यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष नामदेव उसेंडी यांची उपस्थिती होती.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
Last Updated : Aug 29, 2019, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.