गडचिरोली - जिल्ह्यात संचारबंदीमुळे काही प्रमाणात स्थिरावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रोजगार हमीची कामे सुरू करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात 467 ग्रामपंचायतींपैकी 300 ग्रामपंचायतींनी कामे सुरू केली आहेत. या ठिकाणी सध्या 30 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित ग्रामपंचायतीमध्येही तातडीने रोजगार हमीची कामे सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आहेत.
30 हजार मजुरांना कमीत कमी 238 रुपये प्रतिदीन मजुरीप्रमाणे जिल्ह्यात 71 लक्ष रुपये प्रतिदीनी तर दर आठवड्याला 4.99 कोटी रुपये मजुरी स्वरुपात शासनाकडूून दिले जात आहेत. यातून काही प्रमाणात संबंधित नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळत आहे. याचबरोबर गावस्तरावर आवश्यक भौतिक सुविधांची निर्मितीही होत आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त माजगी, घरकुल कामे, बोडी, नाला बांधकाम, नर्सरी यांची कामे सुरू आहेत. यामध्ये वेगवेगळया 1274 ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही याची प्रशासन काळजी घेत आहे.
तालुकानिहाय मजूर (कंसात ग्रामपंचायती) -
अहेरी-778 (26)
आरमोरी-3920 (21)
भामरागड-861 (15)
चामोर्शी-2411 (35)
देसाईगंज- 2364 (15)
धानोरा-6119 (39)
एटापल्ली- 871 (29)
गडचिरोली- 4297 (27)
कोरची- 2071 (19)
कुरखेडा- 3751 (27)
मुलचेरा-1625 (15)
सिरोंचा- 974 (32)