गडचिरोली - आलापल्ली येथील गोंडमोहल्यात सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका २२ वर्षीय युवकाची क्रिकेटच्या बॅटने मारहाण करत त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. उमेश सिद्ध कोडापे असे मृताचे नाव आहे. ही घटना अहेरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आलापल्ली येथील गोंडमोहल्यात एकाचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यात त्या तरुणाला बॅटने मारहाण करत खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून एका आरोपीला अटक केली.
उमेशचा खून कोणत्या कारणाने करण्यात आला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच आरोपी मदधुंद बेशुद्ध अवस्थेत पोलिसांच्या हाती लागला. यामुळे आरोपीचे नाव स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, किरकोळ कारणावरु दोघांत वाद झाला आणि यात त्या युवकाचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरिक्षक विनायक दडस पाटील करत आहेत.
हेही वाचा - अभिनव प्रयोग...ब्रिज कम बंधाऱ्यामुळे वाहतूक झाली सुलभ; १०० एकर शेतीही सिंचनाखाली
हेही वाचा - पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक गडचिरोलीत; शेतकऱ्यांशी साधला संवाद