गडचिरोली - जिल्ह्यात C-60 नक्षलविरोधी पथकावर अस्वलीने हल्ला केल्याची घटना बुधावरी घडली. या हल्ल्यात 2 जवान जखमी झाले आहेत. धानोरा तालुक्यातील घनदाट जंगलात हे जवान नक्षल शोधमोहीम राबवत होते. जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोली पोलीस रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमी जवानांवर तातडीने उपचार केले जात असून जखमी जवानांची नावे कपिल जाधव आणि लोमेश करगामी अशी आहेत.
नक्षलविरोधी पथकाकडून अभियान
गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी पथकाकडून घनदाट जंगलामध्ये दररोज अभियान राबवले जाते. अशाच प्रकारचे अभियान बुधवारी धानोरा तालुक्यातील घनदाट जंगलात राबवले जात होते. तेव्हा अचानक अस्वलाने जवानांवर हल्ला चढवला यात दोन जवान गंभीर जखमी झाले. सर्व जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोली पोलीस रुग्णालयात हलविले. जखमी जवानांवर तातडीनेउपचार केले जात असून जवानांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.