ETV Bharat / state

गडचिरोलीत पोलीस-नक्षल्यांदरम्यान चकमक, 13 नक्षल्यांना कंठस्नान - gadchiroli latest news

आज (शुक्रवारी) सकाळी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान पैदी जंगल परिसरात अभियान राबवत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. सुमारे एक तास झालेल्या चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले.

firing between naxalites and gadchiroli police
गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान; एक तास चकमक
author img

By

Published : May 21, 2021, 10:30 AM IST

Updated : May 21, 2021, 9:35 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये आज (शुक्रवारी) सकाळी चकमक झाली. या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवानांना यश आले आहे. यामध्ये 6 पुरुष आणि 7 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

गडचिरोलीत 14 नक्षलवाद्यांना कंठस्नान

पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये एक तास चकमक -

काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्रावर ग्रॅनाईट हल्ला करून पोलीस स्टेशन उडवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ग्रॅनाईटचा स्फोट न झाल्याने मोठा अनर्थ टळला. तेव्हापासून पोलीस जवान नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. शुक्रवारी सकाळी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान पैदी जंगल परिसरात अभियान राबवत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. सुमारे एक तास झालेल्या चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले.

नक्षलवाद्यांचे मृतदेह

शोध मोहिमेत 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती -

जवानांनी घटनास्थळावर शोध मोहिम राबविली असता 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले. या चकमकीत 13 नक्षलवादी ठार तर काही नक्षलवादी जखमी असल्याचेही पोलीस दलाने म्हटले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

कोटमीच्या नजिक नक्षल्यांची बैठक सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सी-60 कमांडोंनी जंगलात शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान सकाळी साडेपाचच्या नक्षल्यांना पोलिसांची चाहूल लागल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला आणि चकमकीला सुरूवात झाल्याचे गडचिरोलीचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

तासभर चालली चकमक

ही चकमक सुमारे तासभर चालली. चकमकीनंतर उरलेल्या नक्षल्यांनी तिथून पळ काढल्याचे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पीटीआयला सांगितले. घटनास्थळावरून नक्षल्यांचे मृतदेह हस्तगत केले असून परिसरात शोधमोहिम सुरू असल्याचे गोयल म्हणाले. गडचिरोली पोलीस आणि सी-60 कमांडोंनी संयुक्तरित्या ही मोहीम राबविली. यावेळी सुमारे 40 ते 50 नक्षल्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच नक्षली मारले गेले, असे अंकित गोयल यांनी सुरूवातीला बोलताना सांगितले होते.

घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

43 लाखांचे इनाम असलेल्या पाच नक्षल्यांच्या खात्म्यानंतर पाच महिन्यांनी गडचिरोलीत ही मोहिम पार पडली आहे. यावेळी घटनास्थळावर एके-47, एसएलआर बंदूक, कार्बाइन, 303, 12 बोर रायफल, स्फोटके, दैनंदिन वापराचे अनेक साहित्य आढळून आले.

गृहमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतूक -

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील शुक्रवारी नागपूर दौऱ्यावर असताना गडचिरोली पोलिसांच्या शौर्य पूर्ण कामगिरीचे कौतूक करण्यासाठी ते थेट गडचिरोली पोलीस मुख्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून घटनेची माहिती दिली. तसेच आपले पोलीस नक्षलवाद्यांचा समर्थपणे मुकाबला करत असून त्याचा मला अभिमान असल्याचेही त्यांनी म्हटले.

प्रतिक्रिया

पालकमंत्र्य़ांकडून जवानांचे अभिनंदन -

जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी गावाच्या आउटपोस्टच्या हद्दीमध्ये झालेल्या चकमकीत 13 जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. या नक्षलवाद्यांवर शासनाने मोठे बक्षिस जाहीर केले होते. पोलिसांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीवर गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मोहीमेत सहभागी पोलिसांची कौतूक केले आहे.

पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया

13 ही नक्षलवाद्यांची ओळख पटली -

जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत संपूर्ण कसनसूर दलमच्या 13 जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 दलाला यश आले. ठार झालेल्या 13 ही नक्षलवाद्यांची ओळख पटली असून 6 पुरुष तर 7 महिलांचा समावेश होता. या 13 जणांवर एकूण 60 लाख रुपयांचे बक्षीस होते, अशी माहिती गडचिरोली पोलीस दलाने दिली आहे.

हेही वाचा - 'नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान'

Last Updated : May 21, 2021, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.