गडचिरोली - जिल्ह्यातील तेलंगणा महाराष्ट्र सीमेवरती सिरोंचा ( Pushkar festival at Sironcha Gadchiroli ) येथे 13 एप्रिलपासून प्राणहिता नदीतिरी ( Pranhita river pushkar festival ) दर बारा वर्षांनी येणारा बारा दिवसीय पुष्कर मेळावा सुरू आहे. येथे पवित्र स्नानासाठी भाविक दाखल होत आहेत. भाविकांची गर्दी एक आठवड्यानंतरही कमी झालेली नाही. दररोज अंदाजे 10 ते 15 हजार भाविक सिरोंचा व जवळच नगरम घाटावर हजर होत आहेत. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वार्तविली जात आहे.
हेही वाचा - Villagers Killed by Naxals : गडचिरोलीत दोन गावकऱ्यांची नक्षलवाद्यांकडून हत्या; एका नक्षलीचे आत्मसमर्पण
भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी आहे. गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील हे वेळोवळी आवश्यक सुविधांकडे लक्ष देत आहे. त्यांच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन दिवसरात्र काम करीत येणाऱ्या भाविकांचे स्वागत करीत आहे. मोठ्या संख्येने भाविक पुष्कर मेळाव्यात येत असून स्नान करून तल्लीन झाल्याचे चित्र सातव्या दिवशीही आढळले. यावेळी नदी काठावर भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यावर प्रशासनाकडून भाविकांसाठी अधिकच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे प्राणहिता नदीवर दर १२ वर्षांनी येणारा पुष्कर मेळावा १३ एप्रिलपासून सुरू झाला असून २४ एप्रिल पर्यंत भरणार आहे. पुष्कर मेळाव्यात प्राणहिता नदीवर सिरोंच्या येथील नदी घाटावर तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, छत्तीसगडसह महाराष्ट्रातील दररोज हजारो भाविक सिरोंचा येथील प्राणहिता नदी घाटावर पवित्रस्नान करून प्राणहिता नदी मातेला हळद, कुंकू, साडी, बांगड्या समर्पित करून, मनःपूर्वक पूजा पाट केल्या जात आहे. त्यानंतर वेधपंडित ब्राम्हनांची मंत्रोच्चाराने मात्रू - पित्रू व पूर्वजांना पिंडदान केल्या जात आहे. तसेच, नदीकाठावरील श्री. विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेत आहेत. त्यानंतर सिरोंचा पाठोपाठ दक्षिण काशी म्हणून नावाजलेल कालेश्वरम येथील श्री. कालेश्वर - मुक्तेश्वर दर्शन घेण्यासाठी कलेश्वरमकडे भाविकांचे पाऊल वळत आहेत.
कालेश्वरम मंदिराचा पौराणिक इतिहास - भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक कालेश्वरम ज्योतिर्लिंग आहे. भारतात एकाच पीठावर कालेश्वर - मुक्तेश्वर दोन जोड लिंग एकत्र दर्शन मिळणारे एकमेव मंदिर आहे. भाविक इथे बाराही महिने दर्शनासाठी येतात. मात्र, पुष्करस्नानासाठी जवळच महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांना विभाजन करीत सिरोंचा येथून वाहणाऱ्या प्राणहिता नदीच्या घाटावर भाविकांनी दररोज हजारोंच्या संख्येने येऊन पुष्कर स्नानानंतर अत्यंत पुरातन काळापासून प्रसिद्ध काशी विश्वेश्वरनंतर कालेश्वर येथील शिव मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.
हेही वाचा - Pushkar Kumbha Mela : आजपासून गडचिरोलीच्या सिरोंचा येथे पुष्कर कुंभमेळा; दर बारा वर्षांनी होते आयोजन