ETV Bharat / state

गडचिरोलीतील आदिवासीबहुल हिंदेवाडा गावात 100 टक्के लसीकरण - Hindewada village vaccination

तालुका प्रशासनाच्य जनजाग्रुतीमुळे लस घेण्यास पुढे येऊन मौजा हिंदेवाडा गावात 100 टक्के लसीकरण झाले आहे.

vaccination
लसीकरण
author img

By

Published : May 27, 2021, 3:41 PM IST

गडचिरोली - अतिदुर्गम मागासलेला भामरागड तालुक्यातही कोरोनाने हातपाय पसरले आहे. आदिवासी बहुल व अशिक्षिताचे प्रमाण जास्त असल्याने खेड्या पाड्यातील लोकांच्या मनात कोरोना व लसीकरण याविषयी प्रचंड दहशत आहे. अशात तालुका प्रशासनाच्य जनजाग्रुतीमुळे लस घेण्यास पुढे येऊन मौजा हिंदेवाडा गावात 100 टक्के लसीकरण झाले आहे.

हेही वाचा - शरद पवार यांचा सरकारला पूर्ण आशीर्वाद - संजय राऊत

कोरोना व लसीकरणासंदर्भात शहर, खेड्यातही नागरिकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका आहेत. त्यामुळे आजही खेड्यातील लोकं आजारी पडले तरी भीतीपोटी गावाच्या बाहेर पडायला तयार नाहीत. तालुक्यात प्रशासनाच्यावतीने गावा गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक गावात लसीकरण कॅम्प लाऊन लसीकरण करण्यात येत आहे. गावात कॅम्प घेऊनही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. लसीकरणाकरिता टीम गावात गेली असता लोकं जंगलात निघून जातात किंवा घरात लपून बसतात. परंतु अशाही परिस्थितीत ग्रामपंचायत मलम्मपोडूर अंतर्गत येत असलेले व आदिवासी वस्ती असलेले हिंदेवाडा गावाने 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण करून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात वेगळा आदर्श तयार केला आहे. अर्थातच यासाठी प्रशासनाला खूप मेहनत घ्यावी लागली.

प्रशासकीय यंत्रणेकडून जनजागृती -

तहसीलदार अनमोल कांबळे, गट विकास अधिकारी राहुल चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मेश्राम, भामरागड नगर पंचायतचे डॉ. सुरज जाधव यांच्या सूचनेनुसार ग्रामसेवक, आशासेवीका, अंगणवाडीसेवीका व तलाठीसह ग्रा.पं पदाधिकाऱ्यांनी लसीकरणाच्या 4 ते 5 दिवसांपूर्वीपासून गावात जनजागृती करण्यास सुरुवात केली. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने 45 वर्षांवरील व्यक्तीच्या घरोघरी भेटी देऊन याद्या बनवून दिल्या.

गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा पुढाकार

लस घेण्यास तयारीसाठी गावातील शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील पुजारी यांची मदत घेतली. लसीकरणाच्या एक दिवसआधी कोरोना संबंधित सर्व नियम पाळून प्रशासनाच्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व गावकरी यांना एकत्रित करून भामरागड नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव यांना बोलवून मार्गदर्शन केले. अखेर सर्वांच्या सहकाऱ्याने गावात 100 टक्के लसीकरण करण्यात यशस्वी झाले. निश्चितच यामुळे इतर गावात हिंदेवाडा गावाचा आदर्श समोर ठेऊन काम केले तर 100 टक्के लसीकरण होण्यास यशस्वी ठरेल.

हेही वाचा - जायकवाडी धरणाचा पाणीसाठा फक्त 37 टक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.