ETV Bharat / state

कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी युवासेनेच्या 'धुळे बंद'ला संमिश्र प्रतिसाद

कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी युवासेनेच्या 'धुळे बंद'ला संमिश्र प्रतिसाद... जळगावला कृषी विद्यापीठ देण्याची मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा... धुळ्यावर अन्याय झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा युवासेनेचा इशारा

'धुळे बंद'
author img

By

Published : Mar 2, 2019, 6:38 PM IST

धुळे - कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने आज धुळे बंदची हाक देण्यात आली होती. आजच्या या बंदला शहरातील नागरिकांसह व्यावसायिकांचाही संमिश्र प्रतिसाद मिळाला.

भुसावळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विद्यापीठ जळगावला देण्याबाबत घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला युवासेनेने विरोध केला असून कृषी विद्यापीठ धुळ्याला देण्यात यावे, अशी मागणी युवासेनेने केली आहे. या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने शहरात आठवडाभर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर युवासेनेच्या वतीने 'धुळे बंद'ची हाक देण्यात आली होती.

'धुळे बंद'

या 'धुळे बंद'ला नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी काही वेळासाठी व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. मात्र, दुपारनंतर बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, कृषी विद्यापीठ धुळ्यालाच देण्यात यावे, अशी मागणी युवासेनेने लावून धरली आहे. धुळे जिल्ह्यावर अन्याय झाल्यास युवासेना हे आंदोलन आणखीन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Intro:धुळ्याला कृषी विद्यापीठ मिळावे यामागणीसाठी युवासेनेच्या वतीने शनिवारी धुळे बंदची हाक देण्यात आली होती. या धुळे बंदला नागरिकांसह व्यवसायिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी काही वेळासाठी व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती मात्र दुपारनंतर बाजारपेठेत व्यवहार सुरळीत सुरु झाले होते. Body:भुसावळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विद्यापीठ जळगावला देण्याबाबत घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला युवासेनेने विरोध केला असून कृषी विद्यापीठ धुळ्याला देण्यात यावे अशी मागणी युवासेनेने केली आहे. या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने शहरात आठवडाभर आंदोलन करण्यात आलं. यापार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने शनिवारी धुळे बंदची हाक देण्यात आली होती. या धुळे बंदला नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. सकाळी काही वेळासाठी व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती मात्र दुपारनंतर बाजारपेठेत व्यवहार सुरळीत सुरु करण्यात आले होते. कृषी विद्यापीठ धुळ्याला देण्यात यावे अशी मागणी युवासेनेने लावून धरली आहे, धुळे जिल्ह्यावर अन्याय झाल्यास युवासेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.