धुळे - केंद्र सरकारच्या शेतकरी तसेच कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ धुळ्यात कामगार संघटना एकवटल्या असून कोरोनामुळे मोर्चा काढण्याचा निर्णय रद्द करत संघटनांनी मोठी मानवी साखळी तयार करत आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले. आजच्या देशव्यापी संपामुळे बँकांमध्येही शुकशुकाट दिसून आला. तसेच यावेळी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपला निषेध नोंदविला.
या आहेत कामगारांच्या मागण्या-
सर्व गरजूंना पुढील सहा महिन्यांसाठी दरडोई दहा किलो धान्य मोफत द्यावे, रेशन व्यवस्था बळकट करून त्यात रॉकेल आणि साखरसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, पेट्रोल डिझेलवरील करांमध्ये कपात करावी, मनरेगाअंतर्गत 600 रुपये रोजंदारी द्यावी तसेच 200 दिवस काम द्यावे, वित्त क्षेत्रातील सर्व सार्वजनिक क्षेत्र उद्योगांचे खाजगीकरण थांबवावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सार्वजनिक क्षेत्रातील कामगार शेतकरी शेतमजूर मच्छीमार पशुपालक ग्रामीण कारागीर असंघटित क्षेत्रातील कामगार कर्मचारी महिला सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा- अखेर जमलं 'बाबा'! हत्तीवर बसून रामदेव बाबांचा 'योग'