ETV Bharat / state

मंत्रिपद देणार तिकडूनच लढणार; अनिल गोटेंचा सेना प्रवेशाचाही संकेत - anil gote wants ministry ?

धुळे शहरातून मला ७० टक्के नागरिकांची पसंती आहे. धुळे शहराच्या झालेल्या सर्व्हेमध्ये आजही माझा पहिला क्रमांक आहे. सगळ्या राजकीय पक्षांकडून मला उमेदवारीबाबत विचारणा झाली आहे. मात्र, कोणत्याही पक्षाकडून आमदार होणे हे मला पसंत नाही. जो पक्ष मला कॅबिनेट मंत्रिपद देईल त्या पक्षाकडून आपण उमेदवारी करू, असे त्यांनी सांगितले. तर मंत्री झाल्यावर येत्या 5 वर्षात सफारी गार्डन, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यावर भर राहील असेही त्यांनी सांगितले.

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना माजी आमदार अनिल गोटे
author img

By

Published : Oct 1, 2019, 8:16 AM IST

Updated : Oct 1, 2019, 8:29 AM IST

धुळे - आगामी विधानसभा निवडणूकीत जो पक्ष मला कॅबिनेट मंत्रीपद देईल, त्याच पक्षाकडून उमेदवारी करणार असल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'मंत्रिपद' देणार तिकडूनच लढणार - अनिल गोटे

हेही वाचा - धुळे जिल्ह्यात काँग्रेसला पडणार खिंडार? हे 'दोन' आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा

पुढे बोलताना गोटे म्हणाले, धुळे शहरातून मला ७० टक्के नागरिकांची पसंती आहे. धुळे शहराच्या झालेल्या सर्व्हेमध्ये आजही माझा पहिला क्रमांक आहे. सगळ्या राजकीय पक्षांकडून मला उमेदवारीबाबत विचारणा झाली आहे. मात्र, कोणत्याही पक्षाकडून आमदार होणे हे मला पसंत नाही. जो पक्ष मला कॅबिनेट मंत्रिपद देईल त्या पक्षाकडून आपण लढू, असे त्यांनी सांगितले. तर मंत्री झाल्यावर येत्या 5 वर्षात सफारी गार्डन, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यावर भर राहील असेही त्यांनी सांगितले. रावेरमधील 1707 एकर सरकारी जमिनीवर वेगवेगळे उद्योग आणून चालना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपण लोकसंग्राम पक्षाकडून लढण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - काशीराम पावरा यांच्या हाती कमळ, जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार

येत्या ४ तारखेला आपण लोकसंग्राम या पक्षाकडून उमेदवारी जाहीर करणार आहोत. शिवसेनेसोबत आपली बैठक झाली आहे. मंत्रिपदाबाबत आपण मुदत दिली आहे. त्या मुदतीत मला आश्वासन देण्यात आल्यास आपण उमेदवारी करू, हे सांगताना अनिल गोटे यांनी शिवसेनेच्या प्रवेशाचे संकेत दिले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी जोरात कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तर आता अनिल गोटे हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:विधानसभा निवडणुकीत आपण लोकसंग्राम पक्षाकडून उमेदवारी करणार आहोत, धुळे शहरातून मला ७० टक्के नागरिकांची पसंती असून जो पक्ष मला कॅबिनेट मंत्रिपद देईल त्या पक्षाकडून मी उमेदवारी करेल. मला सगळ्याच राजकीय पक्षाकडून विचारणा झाली असल्याची माहिती धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली. कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. कॅबिनेट मंत्रिपदाबाबत बोलतांना अनिल गोटे यांनी सेनेच्या प्रवेशाचे देखील संकेत दिले आहेत.
Body:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याबाबत बोलतांना अनिल गोटे म्हणाले, धुळे शहराच्या झालेल्या सर्व्हेमध्ये आजही माझा पहिला क्रमांक असून सगळ्या राजकीय पक्षांकडून मला उमेदवारीबाबत विचारणा झाली आहे. मात्र कोणत्याही पक्षाकडून आमदार होणं हे मला पसंत नसून जो पक्ष मला कॅबिनेट मंत्रिपद देईल त्या पक्षाकडून आपण उमेदवारी करू, येत्या ४ तारखेला आपण लोकसंग्राम या पक्षाकडून उमेदवारी जाहीर करणार आहोत, शिवसेनेसोबत आपली बैठक झाली असून मंत्रिपदाबाबत आपण मुदत दिली आहे, त्या मुदतीत मला आश्वासन देण्यात आल्यास आपण उमेदवारी करू हे सांगताना अनिल गोटे यांनी शिवसेनेच्या प्रवेशाचे संकेत दिले आहेत. कार्यकर्त्यांनी जोरात कामाला लागावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. अनिल गोटे हे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Conclusion:
Last Updated : Oct 1, 2019, 8:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.