धुळ्यातील स्फोटाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करू - गिरीष महाजन - shirpur taluka
वाघाडी गावाजवळ झालेल्या स्फोटात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. महाजन यांनी रविवारी दुपारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
धुळे - शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ झालेल्या स्फोटात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. महाजन यांनी रविवारी दुपारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
हेही वाचा - धुळे दुर्घटना : पाहा स्फोट झालेल्या कंपनीच्या परिसरातील CCTV दृश्य
शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ असलेल्या एका रसायन कंपनीत शनिवारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले. घटनास्थळी गिरीष महाजन यांनी रविवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंत्री जयकुमार रावल हे देखील उपस्थित होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. चौकशीचा अहवाल आल्यावर दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गिरीष महाजन यांनी दिले. मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना योग्य ती मदत देण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.