धुळे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीच्या पाईपलाईन बाभळे जलशुद्धीकरण केंद्राजवळ फुटल्याने त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ही पाणी गळती थांबविण्यासाठी प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचारी त्याठिकाणी पाठवले आहे. पण, ऐन उन्हळ्यात अशी घटना घडल्याने नारिकांमधून नाराजीचा सूर येत आहे.
धुळे शहरासह परिसराला तापी नदीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या तापी नदीच्या पाईपलाईनला धुळे शहराजवळील बाभळे जलशुद्धीकरण केंद्राजवळ गळती लागून त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. एकीकडे भर उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असताना दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने पाणी वाया जात आहे. तापी नदीच्या पाईपलाईनला गळती लागून त्यातून लाखो लिटर पाणी वाया जाण्याच्या घटना वारंवार घडतात. मात्र, याकडे प्रशासना पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. ही बाब लक्षात येताच प्रशासनाने काही अधिकारी आणि कर्मचारी गळती थांबविण्यासाठी पाठवले आहेत. मात्र, ऐन उन्हाळ्यात अशी घटना घडल्याने नारिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.