धुळे - लोकसभा निवडणुकीचा आज राज्यातील शेवटचा टप्पा आहे. धुळे मतदार संघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, मतदान केंद्रांवर कर्मचारी हजर झाले आहेत.
LIVE UPDATES -
- सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५७.२९ टक्के मतदान
- सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५०.९७ टक्के मतदान
- दुपारी ३ वाजेपर्यंत ४०.४३ टक्के मतदान
- दुपारी ३ वाजता - दुपारी २ वाजेपर्यंत धुळे मतदारसंघात ३०.४३ टक्के मतदान झाले.
- दुपारी १ः५३ - धुळ्यात १ वाजेपर्यंत २९.७५ टक्के मतदान झाले
- सकाळी ११ः५१ - अपक्ष उमेदवार आणि भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय होते.
- सकाळी ११ः ४६ वाजता - आतापर्यंत १८.२६ टक्के मतदान
- सकाळी ९ः५१ वाजता - काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान केले.
- सकाळी ९ वाजता - पहिल्या दोन तासात ६.३१ टक्के मतदान झाले
- सकाळी ९ वाजता - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा आणि सून होत्या. मतदान करुन सगळ्यांनी लोकशाहीचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन भामरेंनी केले.
- सकाळी ७ वाजता - मतदानाला सुरुवात झाली
धुळे लोकसभा मतदार संघासाठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. धुळे लोकसभा मतदार संघात एकूण १ हजार ९४० मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. १९ लाखाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. धुळे लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि धुळे ग्रामिणचे आमदार कुणाल पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे.
धुळे लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया सुरू असून सकाळपासून नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद दिसून येत आहे. मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदारांमध्ये नवमतदारांचा समावेश असून तरुणांमध्ये मतदानाविषयी आकर्षण असल्याचं दिसून आलं आहे.