ETV Bharat / state

'फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा ; धुळे जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठेत प्रचंड गर्दी - धुळे जनता कर्फ्यू

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजेपासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. मात्र, नागरिक संचारबंदीचे उल्लघंन करत असल्याचे चित्र आहे.

धुळे कोरोना अपडेट
धुळे कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 24, 2020, 2:42 PM IST

धुळे - जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजेपासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. मात्र, नागरिक संचारबंदीचे उल्लघंन करत असल्याचे चित्र आहे. येत्या रविवारी खान्देशात साजरा होणाऱ्या कानुमातेच्या उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी बाजारात पूजेच्या साहित्यासह विविध वस्तू खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

संपूर्ण जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 2 हजार 292 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी दुपारी चार वाजेपासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. यादरम्यान मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांनी या जनता कर्फ्यू ला प्रतिसाद द्यावा तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान नागपंचमी नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी खान्देशात कानू मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. या उत्सवासाठी लागणाऱ्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली. शहरातील पाच कंदील भागात पूजेचे साहित्य तसेच फळे खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. यावेळेस सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.अनेक व्यवसायिक आणि नागरिकांनी मास्कचादेखील वापर केलेला नव्हता.

धुळे जिल्ह्यात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाली असताना दुसरीकडे नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गर्दीमुळे वाढणारा संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झालं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.