ETV Bharat / state

Gavathi Gun Seller Arrested: धुळे जिल्ह्यात गावठी पिस्तुलची विक्री करणाऱ्या दोघांना अटक - गावठी बनावटीचे दोन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे

धुळे पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये गावठी बनावटीचे दोन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एक कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची आहे तर अन्य दुसरी कारवाई धुळे तालुका पोलीस ठाण्याची आहे.

Gavathi Gun Seller Arrested
पिस्तुलची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
author img

By

Published : Jun 24, 2023, 6:39 PM IST

गावठी पिस्तुल पकडल्या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याचे मत

धुळे: तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की, मुजाहिद अहमद निसार अहमद (वय ३३, मालेगाव जि. नाशिक) हा त्याच्याजवळ देशी बनावटीचा गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने सोबत बाळगून आर्वी येथे आला आहे. यानंतर शिंदे यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी सदर इसमाचा आर्वी येथे शोध घेतला. यावेळी तो आर्वी गावात मुंबई-आग्रा रोड जवळील चौकात मिळून आला. पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल (गावठी कट्टा) आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाणे येथे विविध कलमांन्वये शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरक्षक महादेव गुट्टे करीत आहेत.

गावठी कट्ट्यासह युवकास अटक: दुसऱ्या कारवाईत शिरपूर तालुक्यातील रोहिणी गावात रवींद्र भगवान भिल हा देशी बनावटीचा गावठी कट्टा सोबत बाळगून दहशत माजवत होता. तो सध्या त्यांच्या राहत्या घराबाहेर उभा आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदारांना दिली. त्या अनुषंगाने पथक रोहिणी गावात गेले असता, एक इसम संशयितरित्या एका घराजवळ उभा दिसला. त्यास पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पाठलाग करून पकडले.

घरात आढळला देशी कट्टा: पोलिसांनी संशयित युवकाची विचारपूस केली असता, त्याने त्यांच्या राहत्या घरात गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतूस लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. रवींद्र भगवान भिल हा परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा सोबत बाळगत असल्याची खात्री झाली. हा मुद्देमाल जप्त करून संबंधिताविरुद्ध काॅन्स्टेबल किशोर ताराचंद पाटील यांच्या खबरीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या पोलिसांचा कारवाईत समावेश: ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, दिलीप खोंढे, धनंजय मोरे, हेड कॉन्स्टेबल संदीप सरग, संतोष हिरे, प्रकाश सोनार, किशोर पाटील, मयूर पाटील, योगेश जगताप, चालक पोलीस नाईक, कैलास महाजन यांनी केली.

हेही वाचा:

  1. Lady Professor Sextortion: विद्यार्थ्याने पाठवला प्राध्यापिकाचा 'तसला' व्हिडिओ तिच्या पतीला
  2. Accused Arrested From Swamp: गुन्ह्यांची हॉफ सेंचुरी पार करणाऱ्या आरोपीला फिल्मी स्टाईलने घेतले ताब्यात
  3. Rape On Girl In Mumbai : बाप-लेकीच्या नात्याला कलंक! पित्यानेच केला मुलीवर बलात्कार, नराधम बापासह शेजाऱ्यास अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.