धुळे - जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 27 कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 354 झाली आहे. आतापर्यंत 166 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 29 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 159 जणांवर उपचार सुरू आहेत.
धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागापाठोपाठ पोलीस दलातही कोरोनाने प्रवेश केल्याचे रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. शिरपूर तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या 84 वर पोहोचली असून 39 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शिरपूर पोलीस दलातील हेडकॉन्स्टेबलसह दोन जण कोरोनाबाधित झाल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. दुसरीकडे साक्री शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. आत्तापर्यंत साक्री शहरात १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
गुरुवारी उशिरा प्राप्त झालेले अहवाल
धुळे शहर : 14
काझी प्लाॅट, इस्लामपुरा (देवपूर), गजानन काॅलनी, सुशील नगर, भोई गल्ली, गोदाई कॉलोनी, अंबिका नगर, वाडीभोकर रोड, मिल्लत नगर, चांदतारा मोहल्ला, रामनगर (वाडीभोकर रोड), हजार खोली (प्रत्येकी एक रूग्ण), महम्मदीया नगर - 2
धुळे तालुका : 1 (तरवाडे)
साक्री शहर व तालुका : 7
एकता चौक - 5
चांदतारा मोहल्ला - 1
दहिवेल - 1
शिंदखेडा तालुका - 2
शिंदखेडा - 1
मालपूर- दोंडाईचा - 1
शिरपूर शहर - 3