धुळे - जिल्ह्यात शनिवारी रात्री तब्बल 20 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 238 झाली आहे. गेल्या 2 दिवसात 26 रुग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. धुळे शहर आणि शिरपूर शहर कोरोनाचे मोठे हॉस्पॉट केंद्र बनले आहे. शनिवारी धुळे जिल्ह्यातील १३ जणांनी कोरोनावर मात केली. शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी २० रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये 17 वर्षांपासून ते 75 वर्षे वय असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. तसेच चाळीसगाव रस्ता, सरदार नगर, आझाद नगर, अंबिका नगर, समता नगर या परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १६ अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 110 जणांनी कोरोनावर मात केली असून, 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पहिले 100 रुग्ण 44 दिवसात आढळले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नव्याने 100 रुग्णांची वाढ ही 15 दिवसात झाली. पहिल्या टप्प्यात 2.27 टक्के असलेला रुग्ण वाढीचा दर आता 15 दिवसात 6.66 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णवाढीचा आलेख 4.39 ने वाढला आहे.
शहरात सध्या 69 कंन्टेटमेंट झोन असून, दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. त्यातच प्रशासनाने व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली आहे.